You are currently viewing गौराई

गौराई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गौराई*

 

सोनियाच्या पावलांनी

आली गौराई अंगणी

साडी पैठणी नेसुनी

जमल्यात सुवासिनी

 

माझी गौराई गोजिरी

काय वर्णू तिचे रुप

मुर्ती लक्ष्मीची शोभते

तिचे तेजस्वी स्वरुप

 

चंदनाचा पीढे पाट

लेकी सुना भरती ओटी

पंच पक्वानाचा थाट

माझ्या गौराई साठी

 

पाटी बैसली गौराई

आनंदले घरदार

नाकी नथनी मोत्याची

मळवट भाळावर

 

दारी सडा सारवण

आंबा पानाचे तोरण

हळदी कुंकू गौराईला

तिचे करू या औक्षण

 

माझी गौराई माऊली

नेसली पैठणी साडी

हिऱ्या मोत्याचे दागिने

कानामध्ये शोभे कुडी

 

नैवेद्य पुरणपोळी

साजूक तुपाची धार

पाहे प्रसादाची वाट

जेवेल सारं घरदार

 

*शीला पाटील चांदवड*

प्रतिक्रिया व्यक्त करा