पुणे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार)
(डॉ. प्रिती पंकज कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत सादर केलेल्या पीएच.डी. संशोधनाचा हा संक्षिप्त आढावा….)
आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानाधारित जीवनशैलीमध्ये शहरी वाहतूक व्यवस्थेत ऍप -आधारित टॅक्सी सेवांनी महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवून आणले आहे. पारंपरिक टॅक्सी सेवांच्या तुलनेत मोबाईल ऍप जीपीएस, डिजिटल पेमेंट, रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि ऑनलाइन बुकिंग यांसारख्या सुविधांमुळे प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि तंत्रज्ञानाधारित झाला आहे. पुणे शहराचा झपाट्याने होणारा शहरी विस्तार, वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतुकीवरील वाढता ताण यामुळे ऍप आधारित टॅक्सी सेवांचे महत्त्व अधिक वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर “A Study of Business Policies of Select App Based Taxi Services in Pune City” या विषयावर पीएच.डी. संशोधन करण्यात आले. या अभ्यासाचा प्रमुख उद्देश पुणे शहरातील निवडक ऍप -आधारित टॅक्सी सेवांच्या व्यावसायिक पद्धती व धोरणांचा अभ्यास करणे, ग्राहक आणि टॅक्सी चालकांचे समाधान तपासणे तसेच पुण्यातील टॅक्सी बाजारातील स्पर्धात्मक घटकांचे विश्लेषण करणे हा होता.
या अभ्यासासाठी Ola, Uber, Meru, Savaari आणि Rapido या सेवांचा विचार करण्यात आला. संशोधनासाठी मिश्र संशोधन पद्धतीचा वापर करण्यात आला. ग्राहकांचे 503 आणि टॅक्सी चालकांचे 410 प्रश्नावलीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचबरोबर 30 ग्राहक आणि 30 चालकांच्या सखोल मुलाखती घेण्यात आल्या. प्रश्नावली, मुलाखती आणि क्षेत्रीय निरीक्षण यांच्या माध्यमातून प्राथमिक माहिती संकलित करण्यात आली.
अभ्यासातून असे दिसून आले की ऍप -आधारित टॅक्सी सेवांमध्ये विविध कंपन्यांची व्यवसाय पद्धती वेगवेगळी आहे. Ola आणि Uber प्रामुख्याने तंत्रज्ञानाधारित ऍग्रीगेटर मॉडेलवर कार्य करतात, तर Meru चा भर फ्लीट व्यवस्थापन व कॉर्पोरेट सेवांवर आणि Savaari चा भर पूर्वनियोजित व आंतरशहरी प्रवासावर आहे. विविध कंपन्यांच्या भाडे धोरणांमध्येही फरक आढळतो. काही सेवांमध्ये मागणी व उपलब्धतेनुसार डायनॅमिक किंमत आकारली जाते, तर काही सेवांमध्ये निश्चित दरांचा वापर केला जातो.
ग्राहकांच्या समाधानाच्या दृष्टीने चालकांचे वर्तन, भाड्याची पारदर्शकता, पेमेंटची सुलभता, तंत्रज्ञानाचा वापर, सेवेची विश्वासार्हता, जीपीएसची अचूकता, वाहनांची गुणवत्ता आणि विविध पेमेंट पर्याय हे महत्त्वाचे घटक असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व घटकांचा ग्राहक समाधानाशी सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण संबंध आढळला.
अभ्यासातील काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष विशेष उल्लेखनीय आहेत. 85.29% ग्राहकांना ऍप वापरण्यास सुलभ असल्याचे आढळले, तर 91.65% ग्राहकांनी विविध पेमेंट पर्यायांना प्राधान्य दिले. सुमारे 74.55% ग्राहक सुरक्षा सुविधांबाबत समाधानी होते. मात्र, भाड्यातील वाढ/सर्ज प्राइसिंग, पीक अवर्समध्ये कॅबची उपलब्धता, चालकांकडून ऑफ-अॅप पेमेंटची मागणी किंवा राइड रद्द करणे यांसारख्या समस्या देखील निदर्शनास आल्या.
टॅक्सी चालकांच्या अनुभवाचाही या संशोधनात महत्त्वपूर्ण विचार करण्यात आला. सुमारे 53.7% चालकांनी प्लॅटफॉर्मसोबत सकारात्मक अनुभव व्यक्त केला; मात्र कमिशन कपात, ग्राहकांचे वर्तन, प्लॅटफॉर्म सपोर्ट, विमा व कल्याणकारी योजनांशी संबंधित काही समस्या त्यांनी मांडल्या. सुमारे 80% चालकांनी त्यांच्या उत्पन्नाबाबत समाधान व्यक्त केले, परंतु काही चालकांनी कामाच्या तासांच्या तुलनेत उत्पन्न अपुरे असल्याचे नमूद केले.
संशोधनाच्या सांख्यिकीय विश्लेषणातून तंत्रज्ञान, कॅबची उपलब्धता, भाडे, आरामदायी सेवा, सुरक्षितता आणि पेमेंट पर्याय या सर्व घटकांचा ग्राहकांच्या वापराच्या पद्धती, समाधान किंवा विश्वासाशी महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे आधुनिक टॅक्सी व्यवसायात केवळ स्वस्त सेवा देणे पुरेसे नसून तंत्रज्ञान, सुरक्षितता, पारदर्शकता, विश्वासार्हता आणि ग्राहक-केंद्रित सेवा यांना समान महत्त्व देणे आवश्यक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले.
या संशोधनाच्या आधारे ऍप -आधारित टॅक्सी कंपन्यांनी पुण्याच्या उपनगरी व कमी सेवा मिळणाऱ्या भागांमध्ये सेवा विस्तारावी, ग्राहकांसाठी अधिक पारदर्शक भाडे व्यवस्था निर्माण करावी, सुरक्षा व जीपीएस सुविधा अधिक सक्षम कराव्यात, चालकांना तांत्रिक व सॉफ्ट-स्किल प्रशिक्षण द्यावे आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन द्यावे, अशा शिफारशी करण्यात आल्या आहेत. तसेच मेट्रो व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी अॅप-आधारित टॅक्सी सेवांचे अधिक प्रभावी एकत्रीकरण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
एकंदरीत, हे संशोधन पुणे शहरातील बदलत्या शहरी वाहतूक व्यवस्थेचा आणि ऍप आधारित टॅक्सी उद्योगाच्या व्यावसायिक धोरणांचा सर्वसमावेशक अभ्यास सादर करते. ग्राहक समाधान, चालक कल्याण, तंत्रज्ञानाचा प्रभाव, सुरक्षितता, भाडे पारदर्शकता आणि शाश्वत वाहतूक या सर्व बाबींचा समतोल साधल्यास पुण्यातील ऍप -आधारित टॅक्सी सेवा अधिक कार्यक्षम, विश्वासार्ह आणि शाश्वत होऊ शकतात, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे.
या अभ्यासाद्वारे पुणे शहरातील ऍप -आधारित टॅक्सी सेवांच्या व्यवसाय पद्धतींबाबत शैक्षणिक तसेच व्यावहारिक योगदान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वैयक्तिक कौशल्ये बाबत बोलताना त्या म्हणाल्या की प्रभावी संवादकौशल्य,
नेतृत्वगुण, टीमवर्क, वेळेचे व्यवस्थापन,
समस्या सोडविण्याची क्षमता, विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन, संघटनात्मक कौशल्य
संशोधन व विश्लेषणात्मक दृष्टिकोन,जबाबदारीची जाणीव, बदलत्या शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
करिअर उद्दिष्ट बाबत त्या सांगतात की
उच्च शिक्षण क्षेत्रातील माझ्या शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक आणि संशोधन अनुभवाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणे तसेच अध्यापन, संशोधन आणि संस्था-विकासाच्या माध्यमातून उच्च शिक्षण क्षेत्रात अर्थपूर्ण योगदान देणे हे काम मला प्रभावी पणे करायचे आहे.
प्रमुख जबाबदाऱ्याचा विचार केल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचे समन्वयन. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी व नोंदणी प्रक्रिया. विद्यार्थी ओळखपत्र (ID Card) प्रक्रियेचे व्यवस्थापन. विद्यार्थ्यांची उपस्थिती व UMS प्रणालीचे समन्वयन. कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण व आवश्यक पाठपुरावा. प्राध्यापक व विद्यार्थ्यांमधील प्रभावी समन्वय. Mentor–Mentee प्रक्रियेचे व्यवस्थापन. प्लेसमेंटसंबंधित उपक्रमांचे समन्वयन. विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी. Project Management विषयाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयन.
संस्थेतील विविध शैक्षणिक कार्यक्रम, उपक्रम व कार्यक्रमांचे व्यवस्थापन.
औद्योगिक अनुभव
BNY Mellon Operational Executive – DSR Team
दैनंदिन ऑपरेशनल प्रक्रियांचे व्यवस्थापन. डेटा व दस्तऐवजांची पडताळणी. टीमच्या कार्यक्षमतेसाठी समन्वय व प्रक्रिया व्यवस्थापन. निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी गुणवत्ता व अचूकतेवर भर.
XL Dynamics India Pvt. Ltd. Associate Analyst
विश्लेषणात्मक व ऑपरेशनल कामकाज. डेटा हाताळणी व पडताळणी. अहवाल तयार करणे व संबंधित टीमसोबत समन्वय.
Shriram Transport Finance Corporation
संस्थेच्या व्यावसायिक व प्रशासकीय प्रक्रियांमध्ये योगदान.
ग्राहक व संस्थात्मक कामकाजाशी संबंधित समन्वय.
Oasis Alcohol India Pvt. Ltd. संस्थेच्या दैनंदिन व्यावसायिक प्रक्रियांमध्ये सहभाग. प्रशासकीय व ऑपरेशनल जबाबदाऱ्या.
J.K. Mechanical वर्क्स संस्थेच्या व्यवसाय व प्रशासकीय कामकाजाचा अनुभव. विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याचा अनुभव. संशोधन अनुभव
पीएच.डी. संशोधन
विषय: “A Study of Business Policies of Select App-Based Taxi Services in Pune City”
या संशोधनामध्ये पुणे शहरातील App-Based Taxi Services संदर्भातील व्यवसाय पद्धती, ग्राहकांचे समाधान, चालक/टॅक्सी ऑपरेटरचे अनुभव, स्पर्धात्मक घटक आणि सेवा-संबंधित बाबींचा अभ्यास करण्यात आला.
संशोधनातील प्रमुख घटक : ग्राहक अनुभव व ग्राहक समाधान.
तंत्रज्ञानाचा वापर. कॅबची उपलब्धता. कॅबचे भाडे/टॅरिफ.
प्रवासातील आराम व सुविधा. सुरक्षितता. विविध पेमेंट पर्याय.
App-Based Taxi Services मधील व्यवसाय धोरणे.
ग्राहक व चालक यांच्या अनुभवांचा तुलनात्मक अभ्यास.
संशोधन पद्धती
Research Design: Descriptive Research Design
Sampling Method: Purposive Sampling
Customer Sample: 503 ग्राहक Driver Sample: 410 चालक Interview Sample: 30 मुलाखती
Statistical Analysis: Descriptive Statistics, Reliability Analysis आणि Chi-Square Tests
Models/Concepts: SERVQUAL, UTAUT आणि E-UTAUT यांचा संदर्भ.
संशोधनातील प्रमुख सांख्यिकीय विश्लेषण
संशोधनामध्ये ग्राहकांच्या समाधानावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी Chi-Square Test चा वापर करण्यात आला.
प्रमुख घटक: तंत्रज्ञानातील बदल व सुविधा, कॅबची उपलब्धता
कॅबचे भाडे, सुरक्षितता, विविध पेमेंट पर्याय.
संशोधनातून App-Based Taxi Services च्या वापरकर्त्यांच्या अनुभवांवर सेवा-सुविधा, उपलब्धता, किंमत, सुरक्षितता आणि तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण प्रभाव असल्याचे परीक्षण करण्यात आले.
वैयक्तिक कौशल्ये त्यांनी आत्मसात केली आहेत. त्यात प्रभावी संवादकौशल्य, नेतृत्वगुण, टीमवर्क, वेळेचे व्यवस्थापन,
समस्या सोडविण्याची क्षमता, विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन, संघटनात्मक कौशल्य
संशोधन व विश्लेषणात्मक दृष्टिकोन,
जबाबदारीची जाणीव, बदलत्या शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता यांचा समावेश आहे.
करिअर उद्दिष्टचा विचार केल्यास
उच्च शिक्षण क्षेत्रातील माझ्या शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक आणि संशोधन अनुभवाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणे तसेच अध्यापन, संशोधन आणि संस्था-विकासाच्या माध्यमातून उच्च शिक्षण क्षेत्रात अर्थपूर्ण योगदान देणे हेच प्राधान्याने असल्याचे त्या नमूद करतात.
,———————————————-
प्रीती कुलकर्णीचा परिचय
प्रीती कुलकर्णी या मुळच्या सातारा येथील. गेली काही वर्षे त्या पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव प्रीती नाईक.
शैक्षणिक व कॉर्पोरेट क्षेत्रातील सुमारे 14 वर्षांचा अनुभव. शिक्षणक्षेत्रातील व्यावसायिक. शैक्षणिक समन्वय, विद्यार्थी व्यवस्थापन, प्रशासकीय कामकाज, प्राध्यापक समन्वय, प्लेसमेंट उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम आणि शैक्षणिक संशोधन या क्षेत्रांत अनुभव. व्यवसाय प्रशासन व व्यवस्थापन विषयात संशोधनाचा अनुभव असून उच्च शिक्षण क्षेत्रात अध्यापन व संशोधनासाठी विशेष रुची.
शैक्षणिक पात्रता पीएच.डी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोंदणी 27 ऑगस्ट 2022 ला केली. प्रबंधाची पूर्तता – 4 सप्टेंबर 2026 झाली. त्यांनी 2021 ला बी. एड. केले. शिवाजी विद्यापीठात 2001 ला बी. कॉम. व 2003 ला एम. कॉम केले.
