सांगली / (प्रदिप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पिंगळा गाजवल्यानंतर मुक्काम पोस्ट पंढरपूर या नाटकात वासुदेवाची भूमिका साकारली आहे.
व्यावसायिक रंगभूमिवर मुक्काम पोस्ट पंढरपूर नावाचे एक नविन नाटक आलेले आहे.नुकताच या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी यशवंत नाट्यमंदिर मांटुगा मुंबई येथे मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलाकारांच्या आणि प्रेक्षकांच्या उपस्थीतीत पार पडला.पहील्याच प्रयोगाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या नाटकात भारत सरकार पुरस्कार विजेते महाराष्ट्राचे सुप्रसिध्द अष्टपैलू युवा लोककलावंत शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकरांनी वासुदेवाची भुमिका साकारलेली आहे.वासुदेवाची परंपरा जपण्याची धडपड आणि त्या परंपरेवरुन आपल्या मुलाबरोबर होणारे सततचे वाद या नाटकात दाखवण्यात आलेले आहे.
या संदर्भात बोलतांना शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर म्हणाले कि या नाटकात वासुदेव या पात्राची परंपरा टिकविण्या विषयी जी धडपड आहे.व्यथा वेदना आहे तीच सगळी धडपड तीच सगळी व्यथा वेदना माझ्या गावगाड्यातील वासुदेवाची आहे.म्हणून माझ्या या गावगाड्यातील लोककलावंताची व्यथा वेदना त्याची परंपरा जपण्यासाठीची धडपड जगासमोर यावी या शुध्द हेतूने हे नाटक स्विकारले.अर्थार्जन हे ऊदीष्ट ठेवून मुळीच हे नाटक स्विकारलेले नाही.
याच नाटकात योगेश चिकटगावकरांनी जात्यावरच्या ओव्या, वासुदेवाचे पद असे एकूण तीन गीतं देखील लिहलेली आहे.त्याच बरोबर चार गाण्यांना संगीत देण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे.
शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर हे संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रतिष्ठीत आणि प्रथितयश लोककलावंत म्हणून परीचीत आहे.त्यांचा पिंगळा लोककला प्रकार तर संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतला. शाळा, महाविद्यालये, किर्तन, सांस्कृतिक आणि लोककला कार्यक्रमांमधे सगळेच जणं त्यांचा गाजलेला पिंगळा आज सादर करतात.जो पिंगळा महाराष्ट्रातून नामशेष झाला होता.मृतप्राय झाला होता त्याच लोककला प्रकाराला परत एकदा जीवनदान देण्याचे काम चिकटगावकरांनी केलेले आहे. आज पिंगळा म्हंटलं कि योगेश चिकटगावकर आणि योगेश चिकटगावकर म्हंटलं कि पिंगळा असं समिकरण बनलय.या व्यतिरीक्त त्यांचे तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला हे शिवगीत, ऊचल तुझी तलवार मराठ्या हे मराठा आरक्षण लढ्याला प्रेरणा देणारे गीत, ज्याच्या नावात पावर हाय, कशाला लागतो नादी हे मनोज जरांगे पाटलांवरील गीत, मुळ स्वभाव जाईना, लेक लाडकी संताची, हजरत मौला मौला, मला पंढरीला नेलं गं बया, वेडी म्हणता मला ही भारुडे, घ्या करुन लसिकरण हे कोरोना लसिकरणावरील गीत, लोककवी स्व.वामन दादा कर्डकांचे माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का हे लोकगीत हे सगळेच काव्य प्रकार खुप गाजलेले आहे.
आजवर त्यांनी हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठ्या मोठ्या कलाकारां बरोबर मालीका, चित्रपट, काॅन्सर्ट , रियालीटी शो या माध्यमातून कामे केलेली आहे.त्यांना आत्तापर्यंत भारत सरकारच्या युवा प्रतिभा परस्कारासह राज्यस्तरीय पन्नास पुरस्कार प्राप्त झाले असून.सोंगी भारुड कार्यक्रमाचे दिड हजार तर लोककला कार्यक्रमाचे अडीच हजार प्रयोग पूर्ण झालेले आहेत.चिकटगावकर हे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत विद्यार्थ्यांना पारंपारीक लोककला प्रशिक्षणाचे काम करत असून आत्तापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास
तीनशे पन्नास विद्यार्थी घडलेले आहेत.सध्या मुक्काम पोस्ट पंढरपूर या नाटकातील वासुदेवाच्या भुमिकेसाठी त्यांच्या कामाचे खुपच कौतूक होत आहे.या वासुदेवाच्या भुमिकेसाठी त्यांनी गायन देखील लाईव केलेले आहे.या नाटकाचे लेखन मयुर सरकाळे आणि आशुतोष जरे यांनी केलेले असून.आशुतोष जरे यांनीच नाटकाचे दिग्दर्शन देखील केलेले आहे.नाटकात मुख्य भुमिकेत हास्यजत्रा फेम सुप्रसिध्द अभिनेता रोहीत माने आहे.तर आईच्या भुमिकेत रात्रीस खेळ चाले वच्छी फेम अभिनेत्री संजीवनी पाटील आहेत.याव्यतिरीक्त अमोल ताठे,बिपीन घोबाळे,सानिका रेणूके यांच्या देखील महत्वपूर्ण भुमिका आहेत.नाटकाचे संगीत आणि पार्श्वसंगीत अजीत परब यांचे असून निर्माते डाँ.ऊमेश आजगावकर, नितीन वैद्य, सुभाष अवस्थी,स्वाती दिवे मुखर्जी आहेत.
अल्प परिचय
प्रा.शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
पिंगळा आणि तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला फेम, भारत सरकारचा “युवा प्रतिभा पुरस्कार” विजेते, महाराष्ट्राचे सुप्रसिध्द अष्टपैलू युवा लोककलावंत व सिने पार्श्वगायक (लोककला अकादमी,मुंबई विद्यापीठ)
मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीच्या माध्यमातुन गेल्या १३ वर्षात जवळपास ३५० विद्यार्थी लोककलेचं प्रशिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत.
लोककला कार्यक्रमाचे २५०० ते सोंगी भारुड कार्यक्रमाचे १५०० प्रयोग पूर्ण.
कलाक्षेत्रात पिंगळा, तो बापाचा बापं वाघ शिवबा जन्मला, ऊचल तुझी तलवार मराठ्या, माझी म्हनू का, स्वभाव, जोहार, हजरत मौला मौला, मला पंढरीला नेलं ग बया अशी विविध शैलितील गाणी सुपरहीट ठरली.
महाराष्ट्र शासनाच्या व भारत सरकारच्या जवळपास १०० महोत्सवांमधे महाराष्ट्रात आणि भारत भरात लोककला सादरीकरण.
भारत सरकारच्या “युवा प्रतिभा पुरस्कारासह” राज्यस्तरीय विविध संस्थाचे ५० पुरस्कार प्राप्त.
महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या “लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार” निवड समितीवर सदस्य म्हणुन नियुक्ती.
स्टार प्रवाहवरील “कुलस्वामिनी” मालिकेतील चिमन्ना तर सह्याद्री दुरदर्शनवरील “विधिलिखीत” या मालिकेतील शितोळे या खलनायकाच्या भुमिका विशेष लोकप्रिय ठरल्यात.
झी मराठी वरील “मराठी पाऊल पडते पुढे” आणि सोनी मराठी वरील “जय जय महाराष्ट्र माझा” या रियालिटी शो मधे सादर केलेल्या विविध लोककला सर्व महाराष्ट्रात लोकप्रिय ठरल्यात.
सह्याद्री दुरदर्शन वरील प्रतिष्ठेच्या “प्रतिभा आणि प्रतिमा” या कार्यक्रमात सुप्रसिध्द अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी लोककला प्रवासा विषयी विशेष एक तासाची मुलाखत घेतलीये.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात “रात्रीचा पाऊस” या चित्रपटातील “मक्याचं कणिस” या गाण्यासाठी सर्वोकृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार,याच गाण्याचे लेखन व संगीत दिग्दर्शन देखील केले होते.
सुप्रसिध्द विनोदी अभिनेता राजपाल यादव आणि जेष्ठ अभिनेत्री ऊषा नाडकर्णी यांच्या समवेत “कडके कमाल के” या हिंदी चित्रपटात विशेष भुमिका.
“सोंग्या” या चित्रपटात “देवा” नावाची महत्वपूर्ण भुमिका केली असुन सुप्रसिध्द गीतकार गुरु ठाकुर यांनी लिहीलेले एक गीत देखील गायले आहेत, तसेच भारुड व निरुपणाचे लेखन देखील केलेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रा.मिलिंद इनामदार यांचे आहे.
लोककला आणि नाटकाच्या जवळपास ३० ते ४० कार्यशाळा संचालक व प्रशिक्षक म्हणुन संपन्न.
राज्यस्तरीय लोककला व नाटकाच्या जवळपास ५० स्पर्धांना महाराष्ट्रात परीक्षक म्हणुन निमंत्रीत.
“महाराष्ट्र कि लोकपरंपरा” या शिर्षकाखाली मराठी लोककलांचा हिंदी अनुवाद करुन संपूर्ण भारत भरात विशेष कार्यक्रम.
