*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पानगळ..आभाळ सावली बापाची….!!*
पानगळ कां थांबवलीस
नव्यानं फुटायच नाही कां तुला
घराच्या निष्पाप सौंदर्याचे
भान आहे की नाही तुला
आपली पोर या दारातून
विदा केली.. आपण
माझ्या… आड लपून
रडलास तू नी…मी पण
माझ्या बुडाखाली खेळणारी
पोर हात पिवळी करून गेली
आजवर …जपून ठेवलेली
अंगावरची माझी ..सालं गेली
सासरी जाण्यापूर्वी पोर माझी
घर डोळ्यांत ..साठवत होती
कोपरा-कोपरा स्पर्श करत
सांजाळ आसव.. ढाळत होती
वरून सारं बघत होतो
मीही.. तिचा बाप होतो
खांद्यावर खेळत वाढवत.. झोके मीचं…तिला देत होतो
निघतांना मिठीत घेत.. म्हणाली
घराला कधीच ऊन्हांत ठेवू नकोस
माझ्या बापाच्या.. घरावरची सावली ..कधी तू सोडू नकोस
हिरव्या आकांक्षाचे मोहर
तिला लाल कुंकूवात
बघेस्तोवर ही पानगळ
आता..यापुढे होणार नाही
या बापाची… आभाळ सावली
या घरावरून कधीच जाणार नाही ..
बाबा ठाकूर ठाकूरीउवाच
गुलकंद …सादरीकरणाची
Environment Forum करता
English मधून.PV.Gadgil Sir
