You are currently viewing लता …. (भूतो न भविष्यती )

लता …. (भूतो न भविष्यती )

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची अहिराणी बोलीभाषेतील लतादीदींच्या स्मृती जागवणारी काव्यरचना

एक व्हती लता तिनं नाव से ना मोठं
इतली ती व्हती मोठी तिनी सांगस मी गोटं
दिनानाथनी ती लेक थायनेरम्हा आजोय
पाच लेकरे पदरे भरी गयी त्यानी खोय …..

बाप संगित नाटक गानाम्हाना मुरायेल
गावो गाव चालेत ना त्याना संगीत ना खेय
पोरे धाकला धाकला बरकत ना ऱ्हायनी
भरजवानी मा कुडी प्राण सोडीनी पयनी..

वर फाटनं आभाय खाले जमिन तापनी
कच्चाबच्चासवर आते चांगली बितनी
बारा वरीस नी लता व्हता देवना तो “गया”
उभा प्रपंच च लिधा डोकावरच सगया ….

तिना गया नि वयख जानकार समजना
म्हनू लागनी ती लता गाना देखा सिनेमाना
अशी पडनी मोहिनी कसदार व्हतं गानं
अख्खा सिनेमानं करी टाके तिनी , सोनं ..

“सरा” बननी घरना तोली धरं एखली नी
बुडी गयी काम म्हा ती माय घरनी व्हयनी
पोसी लिधं घर दार उभी ऱ्हायनी ऊनम्हा
नही पडू दिनं कमी सदा ऱ्हायनी टेचम्हा …

मुरी गई गाना म्हा ती तिनं हुई गये गानं
व्हती परीस ती दखा व्हये गानानंज सोनं
कीर्ति दिगंत व्हयनी गई आसमान पार
दार उघाडं देवनी सुनं झाये घरदारं….

रोमरोम म्हा भिनेल तिले मरन ना भय
सुर तिना ऐकताज देखा गयस आभाय
आते व्हवाव नही हो नही व्हवाव ती लता
चंद्र सुर्य सेतसनां गया ऱ्हाई तिना गाता …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ११ फेब्रुवारी २०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा