You are currently viewing जुलकाफिया

जुलकाफिया

*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम गझल*

 

*अनलज्वाला वृत्त*

  

(जुलकाफिया)

 

सुप्त गुणांची खाण खरोखर असते आई

घरदाराच्या सदा बरोबर फुलते आई

 

संसाराचा गाडा ओढत असते रोजच

घरास सात्विक आणि मनोहर करते आई

 

प्रगती व्हावी सदा मुलांची पती यशस्वी

पदर खोचुनी सतत घरोघर दमते आई

 

सौंदर्याच्या व्याख्या साऱ्या अपुऱ्या पडती

गोरी किंवा काळी- सुंदर दिसते आई

 

सगळी नाती तशा भूमिका निभवत जाते

संस्कारांचा वसा धरोहर जपते आई

 

डॅा.शरयू शहा.

******

प्रतिक्रिया व्यक्त करा