*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वटवृक्ष* (वट पौर्णिमा)
वटवृक्षाचे पुजन
करु या आजच्या दिनी
सुखी ठेव देवराया
माझा कुंकवाचा धनी
माहेराचे सुख गेलं
आता सासरी नांदते
घरादाराच्या सुखाचे
स्वप्न मनात पाहते
सत्यवान सावित्रीचा
त्याचा पाय धरणीला
तैशी कृपा असो देवा
पतिराजाच्या सुखाला
यमदेवालाही जिथं
सावित्रीने जिंकीयल
वचनात बांधुनिया
पती देवाला मागलं
नित्य वडाला पुजते
धागा दोऱ्याचा गुंफते
सात जन्मांतरीच सुख
आयुष्य पतीला मागते
रामप्रहरी पुजते
वटवृक्षाचाच पार
विष्णु नारायण देवा
ठेव सुखाचा संसार
सुवासिनी मी पुजीते
अंगणातल्या वडाला
आयुष्य मागते बाई
माझ्या हळदी कुंकवाला
*शीला पाटील. चांदवड.*