You are currently viewing शिवसेना कुडाळ मालवण अनुसूचित जाती प्रमुख पदी प्राजक्त चव्हाण यांची निवड

शिवसेना कुडाळ मालवण अनुसूचित जाती प्रमुख पदी प्राजक्त चव्हाण यांची निवड

शिवसेना कुडाळ मालवण अनुसूचित जाती प्रमुख पदी प्राजक्त चव्हाण यांची निवड

आमदार निलेश राणे साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब यांच्या उपस्थितीत देण्यात आले नियुक्ती पत्र.

“आमदार निलेश साहेबांच्या विश्वासाला कामातून उत्तर देणार!” – प्राजक्त चव्हाण

सिंधुदुर्ग

अनुसूचित जाती संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देत आमदार निलेश राणे साहेब व जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब यांनी श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या वर विश्वास दाखवत त्यांची शिवसेना अनुसूचित जाती कुडाळ मालवण प्रमुख पदी नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मध्ये नवे नेतृत्व आणि अधिक आक्रमक चेहरा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत सामाजिक उपक्रम, जनतेचे प्रश्न, बांधकाम कामगार, आणि संघटनात्मक कामाचा समन्वय साधणारे प्राजक्त चव्हाण यांच्यावर आता संपूर्ण कुडाळ मालवण मध्ये संघटनात्मक बांधणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

*संघटना मजबूत करण्याचे आव्हान*

पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य वेळी जबाबदारी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखविण्याची भूमिका आमदार निलेश राणे साहेब व जिल्हा प्रमुख दत्ता सामंत साहेब, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, कुडाळ शहर अध्यक्ष अभिषेक गावडे, जिल्हा प्रमुख स्वरूप वाळके यांनी कायम ठेवली आहे. त्याच विश्वासातून युवा नेतृत्व प्राजक्त चव्हाण यांच्याकडे प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे. ही केवळ नियुक्ती नसून नेतृत्त्वावर टाकलेली विश्वासाची मोठी जबाबदारी असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

आगामी काळात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना संघटित करून पक्षाची ताकद वाढविण्यात, वाडी-वस्तीपासून बूथ पातळीपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान प्राजक्त चव्हाण यांच्यासमोर असणार आहे. युवकांचे प्रश्न, स्थानिक समस्या तसेच सामाजिक विषयांवर सक्रिय भूमिका घेणारे आणि कामगार जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरणारी प्रभावी आवाज बनणार अशी अपेक्षा संघटना उभी करण्यावर त्यांचा भर राहणार आहे.

*“ साहेबांच्या विश्वासाला कामातून उत्तर देणार!” – प्राजक्त चव्हाण*
“आमदार निलेश राणे साहेबांनी व जिल्हा प्रमुख दत्ता सामंत साहेबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. पद मिळाले म्हणून थांबायचे नाही, तर या विश्वासाला आपल्या कामातून उत्तर द्यायचे आहे. सिंधुदुर्गातील प्रत्येक कार्यकर्त्याला संघटित करून माझ्या पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. गावागावात संघटना मजबूत करून नव्या युवा नेतृत्वाला संधी देण्याचा माझा प्रयत्न राहील,” असा निर्धार अनुसूचित जाती प्रमुख प्राजक्त चव्हाण यांनी व्यक्त केला.

*गावागावात सेनेची मजबूत फळी उभारणार*

जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि बूथ पातळीवर सेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार प्राजक्त चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. युवा, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना संघटित करून त्यांना पक्षाच्या माध्यमातून काम करण्याची संधी देणे, नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आणि आगामी काळात सेनेची मजबूत फळी उभी करणे, ही आगामी काळातील प्रमुख उद्दिष्टे असणार आहेत.

दरम्यान, प्राजक्त चव्हाण यांच्या नियुक्तीने सेनेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांत आणि समर्थकांमध्ये उत्साह असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सेनेच्या संघटनेला नवी ऊर्जा, धार आणि गतिमानता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा