*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नंद यशोदेचा कान्हा*
नंद यशोदेचा
गोड बाळ कान्हा
आठवावे पुन्हा
रुपडे…..!!
.
सावळे रुप
लोभस आणि सुकुमार
भुरळ फार
पडते….!!
गोपींचा लाडका
दही दूध सांडतो
मडके फोडतो
तरीही....!!
शामल छबी
कटिवरी रेशमी पितांबर
मोरपीस मुकुटावर
शोभिवंत….!!
गोप सवंगड्यांसह
धेनू चरायला नेतो
पावा घुमतो
अद्वितीय…!!
बासरी ऐकताच
धावत येती गोपिका
मुग्ध राधिका
कुंजवनी….!!
कृष्णजन्माचा आनंद
सुंठवडा सर्वत्र वाटला
दहीहंडी गोपालकाला
आनंदाने…!!.
सगळ्यांचा आवडता
नंद यशोदेचा कान्हा
आठवतो पुन्हा
जन्माष्टमीस….!!
संदेश मैत्रीचा
तत्वज्ञान दिले गीतेतून
जीवन दर्शनातून
जगाला…..!!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
अरुणा दुद्दलवार
