You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळा परिचर श्री रविंद्र परब सेवानिवृत्त.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळा परिचर श्री रविंद्र परब सेवानिवृत्त.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळा परिचर श्री रविंद्र परब सेवानिवृत्त.

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील रसायनशास्त्र प्रयोगशाळा परिचय श्री रविंद्र परब आपल्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रा. डी टी देसाई व सह संचालक अॅड.शामराव सावंत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रसायन शास्त्र विभागाची माजी विभागप्रमुख प्रा. विजय फातर्पेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल, सौ परब
रसायन शास्त्रा चे माजी विभाग प्रमुख प्रा. डीडी गोडकर व प्रा. जी एम शिरोडकर, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले,रवी परब हे अतिशय प्रामाणिक, आपल्या कामाशी एकरूप व रसायनशास्त्र प्रयोग शाळेची संपूर्ण माहिती असलेले असल्यामुळे प्रॅक्टिकल ची सर्व जबाबदारी ते उस्फूर्तपणे व उत्कृष्टपणे सांभाळत होते.
याप्रसंगी प्रा.विजय फातर्पेकर,प्रा. जीएम शिरोडकर,प्रा. डी डी गोडकर, डॉ. डी बी शिंदे, प्रा डॉ उदयसिंह पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.यू.सी.पाटील यांनी केले व आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा