You are currently viewing बर्ड फ्लू चा फैलावा मुळे राज्यात हाय अ‍ॅलर्ट घोषित करण्याची गरज!!!!!

बर्ड फ्लू चा फैलावा मुळे राज्यात हाय अ‍ॅलर्ट घोषित करण्याची गरज!!!!!

बर्ड फ्लू चा फैलावा मुळे राज्यात हाय अ‍ॅलर्ट घोषित करण्याची गरज!!!!!

मात्र कोरोना लसीकरण ठरल्यानुसारच …….आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लवकरच लसीकरण सुरू होत असताना राज्यासमोर बर्ड फ्लूच्या रूपानं नवं संकट उभे ठाकले आहे. राज्यातील पाच जिल्ह्यात बर्ड फ्लू चा फैलाव झाल्याचं समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, राज्यात हाय अ‍ॅलर्ट घोषित करण्याची गरज आहे, असे मत मांडले आहे.
वाढदिवसानिमित्ताने जालन्यात आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. बर्ड फ्लू हा अत्यंत धोकादायक आजार असून या आजाराचा मृत्यू दर १० ते १२ टक्के आहे. हे लक्षात घेता बर्ड फ्लू बाबत जास्तीत जास्त सावधानता बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यात हायअ‍ॅलर्ट जारी करायला हवा. पशुसंवर्धन व आरोग्य विभागाने तातडीनं उपाययोजना सुरू करायला हव्यात, असंही त्यांनी सांगितलं.परभणीतील मुरुंबा गावात बर्ड फ्लूमुळं ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं या गावाच्या एक किलोमीटरच्या परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. जेसीबीच्या मदतीनं खड्डा खणून कोंबड्या पुरण्यात येणार आहेत. परभणी जिल्हा प्रशासनानं तातडीनं पावले उचलली असतानाच राज्यातील इतर जिल्ह्यातही बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे समोर आलं आहे.
मुंबई, ठाण्यात कावळे व पोपट बर्ड फ्लूनं मरण पावले आहेत. कोंबड्यांच्या बाबतीत खबरदारी घेणं तुलनेनं सोपं असले तरी कावळे व पोपटांचा संचार कसा रोखणार, असा प्रश्न आता उभा राहिला आहे. या सा-या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी मांडलेले मत अत्यंत महत्त्वाचं आहे.

कोरोना लसीकरण ठरल्यानुसारच!
राज्यात येत्या १६ जानेवारीपासून आधी ठरल्याप्रमाणे लसीकरणास सुरुवात होणार आहे. दररोज १० हजार कर्मचा-यांना करोनाची लस दिली जाणार आहे. कोविशिल्डकिंवा कोवॅक्सिन या दोन लसींपैकी कोणती लस राज्याला मिळेल हे एक-दोन दिवसांत कळेल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =