सिंधुदुर्गातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डीजी कक्ष पदाधिकारी जाहीर
सिंधुदुर्ग
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डीजी कक्ष (सोशल मिडीया) नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे मुखपत्र दै. सामना मधून हि माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे -अमर घाडी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक, प्रसाद रेवडेकर कुडाळ विधानसभा समन्वयक, विठोबा गुरव कणकवली विधानसभा समन्वयक, विनय कदम कुडाळ तालुका समन्वयक, प्रसाद गावडे कुडाळ तालुका सहसमन्वयक, तपस्वी मयेकर मालवण तालुका समन्वयक, श्रीधर सावंत कणकवली तालुका समन्वयक, लोकेश माणगावकर देवगड तालुका समन्वयक, गुलझार काझी वैभववाडी तालुका समन्वयक, ओंकार पंडित वेंगुर्ले तालुका समन्वयक, सिद्धेश कासार दोडामार्ग तालुका समन्वयक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
