वाढदिवसानिमित्त यज्ञा सावंतने दिली शाळेला पाच किलो बटाट्यांची भेट
शालेय पोषण आहारासाठी विद्यार्थिनीचा स्तुत्य उपक्रम; प्रशालेमार्फत यज्ञा व पालकांचे कौतुक
साळगाव :
शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कुमारी यज्ञा गंगाराम सावंत हिने आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या शालेय पोषण आहारासाठी पाच किलो बटाटे देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च न करता शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी मदत करण्याचा यज्ञाचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सहकार्याची भावना आणि दातृत्वाची वृत्ती निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे.
यज्ञा सावंत हिच्या या स्तुत्य दातृत्वाबद्दल शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव यांच्यामार्फत तिचे तसेच तिच्या पालकांचे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले. यज्ञाला वाढदिवसानिमित्त शाळेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
