कणकवली शिवसेना तालुकाप्रमुख राजू राठोड यांचा कळसुली विभागात सत्कार
बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव
कणकवली :
कणकवली शिवसेना तालुकाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल कट्टर बाळासाहेबांचे शिवसैनिक आणि शेवटपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले श्री. राजू राठोड यांचा कळसुली विभागात सत्कार करण्यात आला.
कळसुली विभागप्रमुख श्री. चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्या हस्ते श्री. राजू राठोड यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वागदे गावचे श्री. शिरीष घाडीगावकर तसेच बोर्डवे गावचे माजी उपसरपंच श्री. संतोष येनडे उपस्थित होते.
राजू राठोड यांच्या तालुकाप्रमुखपदी झालेल्या निवडीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
