*अव्यक्त अबोली साहित्य मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
ओलांडली सत्तरी, तरी वृद्धांच्या डोळ्यात असते एक आस
इतकी वर्षे कसा केला असेल बरे आयुष्याचा प्रवास
स्वप्ने होती मनात जीवनाची किती
सुंदर, खास
चष्मा जरी तुटे अनेकदा तरी
न संपली जगण्याची आस.
/1/
खरे तर जीवनाचा प्रवास नसतो
अगदीच सोपा
प्रत्येक पाऊल वाटेवर असतो हमखास धोका
तरुणपणी पाहिलेल्या सुंदर स्वप्नांचा महाल
वृद्धत्व आल्यानंतर तो होतो
सुगरणीचा हवेतील झोका.
/2/
प्रत्येक मानवाची तरुणाईची स्वप्ने
असतात सुंदर
स्वप्नाळलेल्या नेत्रात असतात तेवणार्या ज्योती
वय वाढता वाढता विझतात
प्रकाशाचे दुवे
अंधुकशा प्रकाशात चाचपडतात
विझत आलेल्या वाती.
/3/
सुरकुतलेल्या चेहर्यावर आता चष्माच सोबती
तुटतो, पडतो कितीवेळा तरी
त्याच्यावर असते प्रेम
जीवनसाथी बरोबर कितीवेळा
संसाराच्या गोष्टी
दोघेही सांभाळत बसतो, तुटलेल्या
मोडक्या फ्रेम.
/4/आयुष्य भराच्या साथीचे जसे
देतो एकमेका वचन
तसेच असते मोडक्या चष्म्याला
दिलेले संरक्षण
प्रिय चष्म्याच्या साथीने पहातो
उर्वरित आयुष्य आपण
आपल्या माणसासाठी आयुष्य भर जसे करतो समर्पण.
/5/
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर,
आर्टिस्ट.
