समिधा खपाले (पूनम राटुळ) यांची कोकण विभाग प्रमुख म्हणून निवड
मुंबई प्रतिनिधी : पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत महिला पत्रकारांना संघटनात्मक बळ, सुरक्षितता, सन्मान आणि सक्षम व्यासपीठ मिळतून देण्याच्या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडिया, महिला विंग महाराष्ट्र राज्याची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नारीशक्तीला संघटित करून पत्रकारितेतील महिलांच्या प्रश्नांना बुलंद आवाज देण्याचा निर्धार या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून करण्यात आला आहे, आगि प्रदेशाध्यक्ष म्हणून वैशाली पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच रोशनी बैस आणि सारिका शिंदे यांच्यावर विभागीय प्रदेशाध्यक्षपदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्याच्या सर्व विंग च्या प्रमुख असणाऱ्या रश्मी मारवाडी यांनी ही निवड केली. सविता चंद्रे यांनी या निवडीला अनुमोदन दिले आहे.
व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, भारत देशाचे अध्यक्ष अनिल मस्के, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
*राज्य कार्यकारिणीची यादी*
प्रदेशाध्यक्ष (सुप्रीम): वैशाली पाटील
विभागीय प्रदेशाध्यक्ष : रोशनी बैस, सारिका शिंदे
कार्याध्यक्ष : लक्ष्मी वाडेकर
उपाध्यक्ष: शुभांगी करने
महासचिव : रेणुका कोटम्मकर
सहसचिव : ज्योती सरपाते
खजिनदार: पल्लवी शेटे, मुक्ता आरडे
कार्यवाह: वैशाली चवरे, उषा नाईक,
प्रवक्ते : रंजना जळगावकर
जनसंपर्क प्रमुख : अहिल्या कसपटे
राज्य संघटक : सोनाली सगर, विजया बारसे, धनश्री खडके
संघटक : स्वाती खुणे, सुनीता सकाळीकर
सदस्य: दिशा पाटील, अनुराधा आहेर, सोनिया साठे, रुकसार शेख
*विभागीय महिला प्रदेश प्रमुख*
विदर्भ विभाग: कविता नागापुरे
कोकण विभाग: समिधा खपाले (पूनम राटुळ)
मराठवाडा विभाग : दर्शना बोहड़ाडे पाटील
उत्तर महाराष्ट्र: उज्वला बागुल
पश्चिम महाराष्ट्र : ऋतुजा कदम
महिला पत्रकारांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी, सन्मानासाठी आणि व्यावसायिक प्रगतीसाठी महिला विंग प्रभावीपणे काम करेल. महिला पत्रकारांचे प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवणे, कल्याणकारी उपक्रम राबविणे, नवोदित महिलांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे, डिजिटल संधी उपलब्ध करून देणे तसेच नेतृत्वगुणांना चालना देणे ही आमची प्रमुख उद्दिष्टे राहतील.
