You are currently viewing भाव तेथे देव
Oplus_16908288

भाव तेथे देव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मानसी बापट लिखित लघुकथा*

 

*भाव तेथे देव*

 

रेवा ए रेवा, अग लक्ष कुठे आहे तुझे मी केव्हाची हाक मारतेय तुला काय बिनसले आहे बाळा तुझे आज, मुलाखत कशी झाली काही सांगशील की नाही.आल्यापासून नुसती उदास बसून आहेस.आई ग म्हणून मला मिठी मारून रेवा हमसून हमसून रडायलाच लागली मला काही कळेचना सकाळी आनंदात गेलेली माझी लेक अशी का करते आहे, मी तिला शांत होऊ दिले, रडण्याचा भर ओसरल्यावर ती सांगायला लागली मला की आई मी आज घरून निघाले आणि बिल्डिंग च्या खाली माझ्या समोरून एक मांजर आडवी गेली आणि माझे अवसान च गळाले.कारण आजीनी सगळ्या ह्याच गोष्टी लहानपणापासून आम्हाला सांगितल्या ना की मांजर आडवी गेली की काम होत नाही, ते आठवले आणि मी एकदम टेन्शन मधेच आले की आता मुलाखत अवघड जाणार आणि आई, ह्याच मूळे मला नीट उत्तरे द्यायला जमले नाही अग आणि आता नोकरी लागली नाही तर बाबा ही रागावतील ना.

खरे तर मी शिकले आहे तरी ही ह्या गोष्टींचा पगडा माझ्यावर राहतोच आणि त्याचाच मला खूप राग येतोय.मांजर तिच्या तिच्या मार्गाने जात होती त्याचा माझ्या मुलाखतीशी काहीच संबंध नव्हता तरी ही मी उत्तरे दिली नाहीत.

आजी नी किती किती काय काय सांगितले होते तेच आठवायला लागले काय तर म्हणे पाठचा भाऊ असेल तर सोमवारी नहायचे नाही, कुणी गावाला जात असेल तर लगेच दार बंद करायचे नाही,गावाला कोणी गेले तर लगेच केर काढायचा नाही आणि विधवा बाई ने टिकली मंगळसूत्र घालायचे नाही.घरातच बसायचे.हसायचे नाही कुणाशी बोलायचे ही नाही.किती त्या अंधश्रद्धा न काय.

पूर्वापार चालत आले म्हणून करत राहायचे त्यातून स्त्री ला त्रास झाला तरी चालेल तिने ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत. मुलगी वयात आली की तिने हसून पुरुषांशी बोलायचे नाही, सातच्या आत घरात यायचे. का ग आई हे सगळे नियम आम्ही बायकांनीच का पाळायचे.

सण असला तर सोवळ्यात स्वयंपाक करायचा सगळे जेवून जाईस्तोवर तिने काहीही खायचे नाही.बऱ्याचदा ती चक्कर येऊन पडायची पण बोलणार कुणाला.

गौरी येणार म्हणून स्वच्छता करायची घर आवरायचे आणि मग साग्रसंगीत स्वयंपाक करून माहेरवाशिणी ला खुश करायचे पण ह्यात स्वतःचे हाल होतात हे समजत नव्हते का ग तिला.

आता काळ बदलला पण माणसांचे संस्कार आणि चालीरीती नाही न बदलल्या अजून.अजून ही स्त्रीने बदल करायचा म्हटला की सगळे तिलाच नावे ठेवतात.

का नाही लक्ष्यात घेत घरातले की *भाव तेथे देव* असतो.

कुठलीही गोष्ट मनापासून केली की देवाला पोचते.

आई आता तू ही ह्या अंधश्रद्धा पाळायच्या नाहीत आणि मी ही नाही.

मला नाही वाटत देव आपले काही वाईट करेल.

बरे झाले मांजर आडवी गेली ती त्यामुळे इतकी वर्ष मनात साठवून ठेवलेले दुःख माझे बाहेर आले.

आणि आई तू ते ऐकून ही घेतलंस.

आता मला नक्की नोकरी मिळणार बघ.

*आता मी ठरवले आहे *ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे*

रेवा चल दमली असशील खूप वेळ झाला आता जेऊया आपण.

रेवा म्हटली ते पटले मला, खरेच की आपण सासूबाई सांगतात म्हणून प्रत्येक गोष्ट करत गेलो त्यामागचे कारण जाणून घ्यावेसे कधीच का वाटले नाही.आज रेवा सारख्या मुली नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर जातात, घरचे ऑफिस चे काम व्यवस्थीत करतात.सणवार ही सांभाळतात पण जरा नव्या पद्धतीने.

खरे तर आपण कौतुक करायला हवे ह्या नवीन पिढीचे पण आपल्या डोक्यातून त्या जुनाट कल्पना जातच नाहीत ना कारण वर्षानुवर्षे आपण तेच तेच करत राहतो.परवा कुठेतरी वाचली मी ही गोष्ट की त्यांच्या घरी नैवेद्य बनवत असताना घरचा कोंबडा स्वयंपाकघरात आला आणि आता मधेच तो गडबड करेल म्हणून सासू ने त्यावर टोपली टाकून त्याला गप्प केले.त्यावेळेस सून स्वयंपाक करत होती म्हणून तिला वाटले की ही आपल्या घरची पद्धतच आहे म्हणून दर वर्षी ती असेच करायला लागली.तिची सून आल्यावर ही पहिल्या वर्षी हेच तेव्हा सुनेने कारण विचारले ते काही सासूला सांगता आले नाही आणि सुनेने तेव्हापासून ती पद्धत बंद केली.

आपल्या पिढी ने बदल नाही केले पण ही पिढी बदलत असेल तर ते स्वीकारायला च हवे ना.

माझ्या ह्या निर्णयाचे घरात सगळ्यांनी स्वागत केले आणि हो आमच्या घरचे पुरुष ही म्हणाले की आम्ही ही वेळ पडली तर स्वयंपाक करू.

*जुन्याला देऊन फाटा* *नव्याचे करू स्वागत*

*जगू आनंदात एकमेकांच्या साथीने*

 

*सौ मानसी बापट बंगलोर*

प्रतिक्रिया व्यक्त करा