You are currently viewing कोरोना
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

कोरोना

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचचे सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक, कवी प्रा.डॉ. जी. आर. उर्फ प्रवीण यांचा अप्रतिम लेख

पूर्व दिशेला हसला बुद्ध
अघोषित सुरू झाले युद्ध

धर्म जात पात लिंग भेद
नाही राहीला व्यर्थ छेद
माणुसकी हरली येथे खुद्द
पूर्व दिशेला हसला बुद्ध

घातला घाला तो जीवावर
संकट आले प्राणी मात्रा वर
खाण्या पिण्याचे ठेवावी शुध्द
पूर्व दिशेला हसला बुद्ध

करू मात या आपत्ती वरी
हिंडू नका खा प्या बसा घरी
काटेकोर रहा नियमबद्ध
पूर्व दिशेला हसला बुद्ध

घोडचुक ही आहे मानवाची
कीव येऊ दे प्राणी पक्ष्याची
प्रत्येक गोष्टीला आहे सरहद्द
पूर्व दिशेला हसला तो बुद्ध

एक दिवस दिसेल यमाचे घर
माणुस प्राणी होतोय मग्रूर
नका पार करू ती सरहद्द
पूर्व दिशेला हसला तो बुद्ध

कोरोना

 

नशिबाच्या काळ्या कुट्ट अंधारात
दिवस उजाडतो तेव्हा
सुर्यकिरणे ही भेसुर वाटु लागतात
बातम्या चे रतीब सुध्दा कंगाल
वाटू लागतात
त्या कर्दमलेल्या अंधारात निष्पाप
जीवांचे कारुण्य रुदन असते
नवे किती जुने किती
असा अकडेमोडीचा प्रश्न आ वासुन
उभारलेल्या भरकटलेल्या फाटक्या गलबता सारखा असतो
भरकटलेल्या घराचे दाराचे उंबर्याचे
तो देणकरी असतो
कुठं जावं त्या घरा दारांनी भीक
मागण्यांसाठी कोण वाली मिळतो का
कोण शिशु कोण तरुण कोण वृद्ध कोण स्त्री

सहस्त्र किरणांच्या प्रखर ज्वाळा आग
ओकीतच सूर्य नारायण उजेडतो तोच
काळा कुट्ट अंधार घेऊन त्या काळ्या कुट्ट अंधारात दिवसाचे गर्भ गळीत जीव लपलेले असतात सकाळची प्रसन्नता शुचिर्भूत पणा चा लवलेश दिसत नाही प्रत्येक सजीव निर्जीव वस्तु मरगळलेल्या दिसतात
गाव शहर गल्ली बोळ देवस्थान
बाजार बस स्थानके सर्व चिडीचूप
स्मशान शांतता काळीज चिरत जाते
मध्येच कुत्र्यांची केकटण्या ची लहर शांतता फाडून जाते लांबुन येणारी टिटवी विचित्र आवाज काढीत गावाला
वेढा मारते
अश्या या परिस्थितीत बळीराजा मात्र न जुमानता शेताकडे पळताना दिसतो त्याच जगच मातीची सेवा करण्यात मश्गुल होत त्याचे काबाड कष्ट हे अविरतपणे चालु असतात मनात त्याच्या घालमेल असते अवंदा काय कऱयाच
अक्किती जवळ आली हाय हाळीद बेण कुठं घावल सोयाबीन बी कुठलं घ्यावं मशागत ची कामे संपत आली हायती खत तर विस्कटून झालंय नांगरट झाली कुंदा खणून झाला पण बेण्याचं काय ? खात्रीशीर बेणे कुठं घावल याचीच चिंता !
वळीव तर झकास झाला मिरीग येळ वर फिरलं काय पाऊसमान कस असेल देवाला च ठाऊक एक मात्र बर झालं या कोरोना नि समदी मुलं शेतात राबया लागली
घरी बसण्या परीस कामधंदा हुतु व मेहनत हुती भुक लागती रिकामी डोकं भुताच खोक डोक्यात कोणतंबी चिंता येत नाय तोंडाला फडकं बांध साबणाने हात धुवा कुणी
सांगितल त्यापरा स मातींनी हात धुतल की समद कस मन निर्मळ हुतय
धरणी माय समद पोटात घेती व पोटाला घालती
दिवस उजडला तस झोपडपट्टी त कालवा कालव चालु झाली रोजनदारी नाय की हातात काम नाय पगार पट्टी नाय पोट कस भरावीत ही भ्रांत चालु हुती पैका नाय खायचं काय
सरकार रेशन देत पण मीठ मोहरी तेलाला पैसे नकोत कशीतरी पोटाची बेगमी भागवता मानस जेरीला अली हुती त्यात सरकारी फतवा कुठं जायचं नाय घरी बसा
प्रत्येक जण तोंडात दात घालून बसत होता तोंड कस हलवायच ही भ्रांत कितीतरी कोस कोस गाव सोडुन
पोट भरण्यासाठी आलेली ही झुंड कशीबशी परगावत शहरात स्थाईक झाली ले गावाकडील आठव काढीत पायाच मुटकुळे करून बसलेली दिवस
कस काढायचे ह्या विचारात डोकी सुन्न
झाल्या गत डोळे खोबणीत खोल गेल्या सारखी नजर शून्यात हरवून बसली होती हे दिवस कस सरतील कधी कामधंदा मिळलं अस झालं होतं
लहान मुलांचा बर होत त्यांना काय झालंय हेच कळत नव्हतं पण बाहेर जाऊन खेळता येत नव्हतं
बिना गुन्ह्याची दंड शिक्षा पण सश्रम कारावास नव्हता तो असता तर परवडला असता हा अर्धपोटी कारावास स्वतंत्र्य हरवलेला इंग्रजा पेक्ष्या ही शिक्षा भयंकरच होती
ह्या पापाचे धनी कोण हे मात्र त्यांना सांगता येत नव्ह

ही कायमची गेली असते हे जग सोडून त्या काळ्या ढगाळ विक्राळ राक्षसाला च माहीत
पांढऱ्या ढगातून पांढरे देवदूत सुध्दा हतबल होतात
हे पाप कुणाचं कोणत्या सरकारच की
कोणत्या देशाचं की त्या कापडात गुंडाळलेल्या जीवच
मानवाने दिलेला मानवजातीला शाप तर नाही ❓प्रारब्ध / प्राक्तन / नशीब हे सटवाई चे काम परस्पर बिनबोभाट चालु आहे प्रत्येक जिवाच्या समाधी वर मेणबत्ती लावण्या साठी पण मोहलत नाही परवानगी नाही हा च तर काळा कुट्ट शाप आहे

 

अंधारात बुडालेला सूर्य उजाडतो तेच मुळी प्रखर तप्त किरण घेऊन त्याला कशाचा थांगपत्ता नाही प्रथ्वी वरती काय होऊ घातलंय काय होणार आहे ह्या अघटीत गोष्टीत त्याला रस नाही किंबहुना त्याला त्याचे देणं घेणे पण नाही त्याला ओढ आहे प्रकाशाची खऱ्या ज्ञानाची चराचर श्रुष्टी च झगमगीत करण्याची तरीपण त्याच्या उजेडात आता काळ धूसर ग्रहण लागले आहे की काय असे वाटते
प्रथ्वी तलावरची महानगर स्वप्न श्रुष्टीतील इंद्रनगरी झाडून रसातळाला जाऊ लागली आहेत ह्याच भान त्या सुर्या ला नाही सगळी नगर भुकी कंगाल दारिद्र्यात खितपत पडली आहेत त्यांचं तेज ओसरून मरगळुन पडली आहेत
महानगरातील ऐशो अराम त्याचा राजेशाही थाट दिमाखात मिरवणारी उंच उतुंग हवेल्या गगनचुंबी
इमारत मोठे राजरस्ते उड्डाण पूल पादचारी मार्ग हे महामारीच्या विळख्यात अडकली आहेत सर्व यातायात बंद पडली आहेत मोठे मोठे रेस्टॉरंट पब बार ललना चा नृत्य थरार
मॉल्स सांस्कृतिक भवन नाटक घरे एवढंच काय तथा कथीत मंदिरे काळाच्या जबड्यात शृंखला बंध झाली तेथे मानवाचे काय ❓
काही देवदूत कर्ण कर्कश्य आवाजात फिरणारे रुग्णवाहिका रुग्ण
रुग्णालय यांचाच दीर्घकाळ मेहनत घेत आहेत का बरं अशी परिस्थिती ला
सामोर जावं लागतंय याचा विचार पण
कोण करताना दिसत नाही
काही महानगराच्या वाटी शांघाय
होण्याचं नशिबी आलं कारण नसतानाही गव्हा बरोबर किडेही चेंगरले जात आहेत एवढं मात्र नक्की
अजुनी वेळ गेलेली नाही माणसाने मानवतेच्या च मार्गाने गेलं असत तर आजची परिस्थिती आली नसती
चंगळवादी संस्कृती नडली पैश्यानी काहीही विकत घेता येत ही
जे मागाल ते मिळत जिभेचे चोचले पुरवण्याचे डोहाळे हे उच्चभृ संस्कृती त मिरवायला लागली जे श्वापद ही श्रुष्टी चे रक्षक आहेत त्याच श्वापदावर
मानवाचं अतिक्रमण हेच विघातक आहे हे सिद्ध झालं अनेक प्रकारचे खाद्य अन्न उपलब्ध ता असताना हे अघोरी प्रकार करून आत्म संतुष्ट करणे व मुक्या जीवांची हत्या करणे
हेच मुळात निसर्ग विरुद्ध घटना अश्या
शापास कारणी भूत होत नाही का ❓ अरे मानवा कुठे होतास अन काय झालास अस निसर्ग देवतेला वाटू
नये का प्रत्येक गोष्टीत स्वर्गसुख नसते रे कष्टाच्या कमाईत जे मिळेल तेच स्वर्ग अति हव्यास मग स्वर्गवास
हे ठरलेलं आहेच ज्याला त्याला एक ना एक दिवस जायचेच आहे निदान जाताना इतरांच्या साठी निसर्ग राखुन ठेव नाहीतर हे असेच दुखणे तू तुझ्या
माथी मारून घेऊ नकोस
जगा व जगु द्या हाच मूलमंत्र लक्ष्यात ठेव त्यातच तुझं व मानवाचे
येणाऱ्या पिढीचे कल्याण आहे

प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
(राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारीत )
अंकली / बेळगांव 9164557779
कॉपी राईट

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + sixteen =