नांदेड :
नांदेड येथे व्हॉईस ऑफ मीडिया – VOM इंटरनॅशनल फोरमच्या मराठवाडा स्तरीय केडर कॅम्पला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून, या कॅम्पला पदाधिकारी आणि पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या केडर कॅम्पसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे विलास बडे, राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, नरेंद्र देशमुख, राज्य सरचिटणीस चेतन कात्रे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी नांदेडमध्ये उपस्थित आहेत.
मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना या विशेष कॅम्पसाठी निमंत्रित करण्यात आले असून, मराठवाडा अध्यक्ष डॉ. गणेश जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कॅम्पच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले आहेत.
हा केवळ एखादा कार्यक्रम किंवा इव्हेंट नाही! हा जबाबदार पदाधिकारी आणि संवेदनशील पत्रकार घडविण्याचा केडर कॅम्प आहे.
या कॅम्पच्या माध्यमातून प्रत्येक पदाधिकाऱ्याने संघटनेची जबाबदारी समजून घ्यावी, पत्रकारितेची मूल्ये आत्मसात करावीत आणि पत्रकार तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी, हा प्रमुख उद्देश आहे.
पत्रकारांसाठी काम… पत्रकारितेची मूल्ये जपण्यासाठी काम… आणि पत्रकारांच्या कुटुंबियांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काम — हाच व्हॉईस ऑफ मीडियाचा खरा विचार.
