You are currently viewing अवयव तस्करांस उघडे पाडा

अवयव तस्करांस उघडे पाडा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अवयव तस्करांस उघडे पाडा*

 

ईच्छा असता मनी आपल्या

होवून जाते *अवयवदान*

नाही लागत मुहूर्त कोणता

अचूक पडत आपणास दान

1

तीही निघाली आज अवेळी

लक्ष लागल *प्रकाशकडे*

गरीब बिचारी थकली होती

बातमी ऐकून जीव धडधडे

2

शास्त्रीनगरचे रस्ते अवघड

दिवसभर फिरतात *वळू*

प्रश्न पडतो वृध्द माणसांना

आंगावर आला तर कुठे वळू

3

हिय्या करून वलांडला रस्ता

तडक गेली ती *हाॅस्पीटलात*

पाहून *मूर्छीत* प्रकाशला

समजून गेली आपल्या मनात

4

घेऊन निर्णय “अवयवदानाचा”

कृतार्थ केले *आठ जणांस*

नाही राहीली *अबला* कोणी

सक्षम आहेत निर्णय घेण्यास

5

सामील होत अशा चळवळीत

आपणही करावा *निर्धार*

वाया न घालवायची मृत संपती

कितीही होवून दे *वज्र प्रहार*

6

प्रणाम करून अशा वीरांगनेस

अवयवदानाचा गातो “पोवाडा”

विनंती करतो माता भगिनींस

*अवयव तस्करांस उघडे पाडा*

 

7

विनायक जोशी 🖋️ठाणे

गुरुवार/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा