पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर यांच्याकडून पालकमंत्री नितेश राणे यांचे कौतुक; सलग १४ वर्षांच्या विशेष रेल्वे उपक्रमाबद्दल कोकणवासीयांच्या वतीने मानले आभार
देवगड / प्रतिनिधी :
गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्यातील विविध भागांतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सलग १४ वर्षे विशेष रेल्वे उपलब्ध करून देणारे पालकमंत्री नितेश राणे यांचे कोकणवासीयांनी मनापासून आभार मानले आहेत. यंदाही गणेशभक्तांसाठी दोन ‘मोदी एक्सप्रेस’ विशेष गाड्यांची सोय करण्यात आल्याने सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जनतेच्या सुख-दुःखाची जाणीव ठेवणारे नेतृत्व कोकणाला मिळणे हे भाग्याचे असल्याचे मत पडेल मंडळाचे भाजप अध्यक्ष बंड्या नारकर यांनी व्यक्त केले.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत भावनिक आणि जिव्हाळ्याचा सण आहे. नोकरीनिमित्त मुंबईसह अन्य शहरांमध्ये राहणारे चाकरमानी वर्षभर या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येण्यासाठी मोठी गर्दी आणि मर्यादित प्रवासाची साधने यामुळे चाकरमान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
ही अडचण ओळखून पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून गेली १४ वर्षे ‘मोदी एक्सप्रेस’च्या माध्यमातून चाकरमान्यांना मोफत आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांना कोणत्याही त्रासाविना आपल्या गावी पोहोचून बाप्पाचा उत्सव साजरा करता येतो.
यंदा दोन ‘मोदी एक्सप्रेस’ विशेष गाड्यांची सोय करण्यात आल्याने चाकरमान्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आपल्या गावाकडे, आपल्या कुटुंबीयांकडे आणि गणरायाच्या चरणी सुखरूप पोहोचण्याची संधी मिळाल्याबद्दल कोकणवासीयांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.
कोकणवासीयांच्या सुख-दुःखात कायम सहभागी होणारे नेतृत्व आणि कोकणच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढील कार्यासाठी कोकणवासीयांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
