You are currently viewing इश्काचा खेळ

इश्काचा खेळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम लावणी*

 

*इश्काचा खेळ* 

 

इश्काच्या खेळात कुणी आणली आणिबाणी

रात झाली राया लावू चला मच्छरदाणी ||धृ||

 

मच्छर झुरळ उपद्रव वाढला फार

बंदोबस्त करा आधी लावा खिडकी दारं

पळतील सारे कासवछापच्या वासानी

रात झाली राया लावू चला मच्छरदाणी ||१||

 

इश्काच्या खेळात ज्वानीनं भरलाय ज्वर

उभार अंगाला छळतंय येडं कबूतर

सुगंधीत झाली रात्र फुलली रातराणी

रात झाली राया लावू चला मच्छरदाणी ||२||

 

केशर दुधाचा प्याला हळूहळू संपवा

पानाचा देठ हिरवा कचकण खुडवा

प्रितीच्या पानानं नशा चढावी तनीमनी

रात झाली राया लावू चला मच्छरदाणी ||३||

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा