*दिव्यांगांच्या सेवाकार्याचा होणार सन्मान;
3 डिसेंबरला सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय दिव्यांगपुरस्कार सोहळा”!*
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य दिव्यांग पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
*दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या संस्था, व्यक्ती, उद्योजक, शिक्षक, ग्रामसेवक व सरपंचांचा होणार सन्मान!**
सिंधुदुर्ग :
३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन जगभरात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी, सक्षमीकरणासाठी तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने भव्य **जिल्हास्तरीय दिव्यांग पुरस्कार सोहळ्याचे** आयोजन करण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, सेवाभावी व्यक्ती, दिव्यांग उद्योजक, इतर उद्योजक, शिक्षक, ग्रामसेवक, सरपंच तसेच दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्य
दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे, तर समान संधी, स्वाभिमान आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी समाजातील विविध घटकांनी केलेल्या कार्याची दखल घेणे हा या पुरस्कार सोहळ्यामागील मुख्य उद्देश आहे.
समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या आणि दिव्यांग बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि इतरांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून दिव्यांगांच्या हक्क, सन्मान, स्वावलंबन आणि सर्वांगीण विकासाचा संदेश संपूर्ण जिल्ह्यात पोहोचविण्याचा आयोजकांचा मानस आहे.
त्यासाठी अर्ज करण्याची तारीख २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत करणे अर्ज अनिवार्य आहे.असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
संपर्क क्रमांक: संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर: ९७६५९७९४५०
कार्यालयीन संपर्क :९६२३६५५१४२
कार्यालयाचा पत्ता: मु.पो. कसाल, कॅनरा बँक नजीक बागवे डॉक्टर यांच्या बाजूला, ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. ४१६ ६०३.
