*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”चंद्रदेव”*
नित्य चंद्र देवा आम्ही करितो वंदन
तुझ्यातले लावण्य करिते आकर्षितIIधृII
तू मनुष्याचे प्रेमाचे प्रतिक मधुचंद्र
तुझ्यावर लिहिली अनेकांनी प्रेम गीतII1II
तू गगनीचा आहेस राजा रामचंद्र
तुझा शितल प्रकाश करितो मोहितII2II
खनिजं सुंदर आहेत तुझ्या भूगर्भात
तुझ्यामुळे दिसतात चांदण्या खुलूनII3II
तुझ्या बारा पौर्णिमांचे महत्त्व अनन्य
सप्तमीचा चंद्र असे ऐतिहासिक क्षणII4II
तुझे मानवाला आहे सदा आकर्षण
आम्ही तुझे सौंदर्य करू अबाधीत जतनII5II
आम्हा भारतीयांना द्यावे सुयश मोहिमेत
स्पर्शुदेत तुजला भूमीवर ठेवू दे पदII6II
आम्ही भारावून भेटीला येतो प्रेमानं
स्वीकार करा प्रेमाचे द्यावे आलिंगनII7II
©️काव्य: श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
