माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय सचिन सावंत यांचा भाजपात प्रवेश; ठाकरे सेनेला धक्का
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी केला पक्षप्रवेश
सचिन सावंत 28 वर्ष होते उबाठा सेनेत सक्रिय
कणकवली :
ठाकरे शिवसेना सचिव,माजी खा.विनायक राऊत यांचे निकटवर्तीय, कणकवली देवगड,वैभववाडी माजी विधानसभा प्रमुख सचिन सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे कणकवलीत ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.त्यांच्या समवेत कणकवली तालुक्यातील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत केले.
या प्रवेशात कणकवली- देवगड माजी विधानसभा प्रमुख सचिन सावंत, यांच्या सोबत कसवन माजी उपसरपंच मनोहर मालंडकर, सतीश सापळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद गांवकर, विलास सावंत, सखाराम घाडीगांवकर, प्रकाश मेस्त्री, सुरेश गुरव, वैभव शेटये, सत्यवान मेस्त्री, अजित मेस्त्री, हळवल माजी उपसरपंच विष्णू ठाकूर ,दिलीप ठाकूर, राज सावंत ,मंगेश राजाध्यक्ष, उमेश मेस्त्री आदी ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कळसुली जिल्हा परिषद शितल दळवी, जि.प.सदस्य संदीप गावडे, माजी बँक अध्यक्ष सतीश सावंत, सभापती हर्षदा वाळके,उपसभापती सोनू सावंत,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,वागदे सरपंच संदीप सावंत, सरपंच मिलिंद सर्पे, उपसरपंच भाई सावंत, चेअरमन प्रशांत सावंत, माजी सरपंच अशोक सर्पे, बंड्या मालंडकर, ग्रामस्थ अभय गावकर, महेंद्र गावकर, गणपत मेस्त्री, उमेश गुरव, प्रमोद तेली, मॅक्सी फर्नांडिस, एकनाथ सावंत, लवू दळवी, संतोष सावंत, मनोहर नाधावडेकर, संतान फर्नांडिस, मंगेश गुरव, कृषी सेवा प्रतिनिधी दिनेश मेस्त्री, तुषार सर्पे, महेंद्र गुरव, प्रशांत तळवडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो … भारत माता की जय … वंदे मातरम् अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची क्षमता निर्माण झालेले आहे. पालकमंत्री त्या दृष्टीने काम करत आहेत.या सर्व गोष्टींचा विचार करता गावातील आणि विविध भागातील जनतेच्या मागण्या उबाठा सेनेच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकत नाही. आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला असल्याचे सचिन सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
