*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी पत्रकार प्रदीप जोशी लिखित अप्रतिम कविता*
*सलाम!*
सलाम तुमच्या भाषणांना
सलाम तुमच्या घोषणांना
सलाम त्या आश्वासनांना
सलाम त्या निवडणुकांना ll
सलाम त्या राजकीय पक्षाना
रंग बदलत राहणाऱ्या झेंड्याना
सत्तेसाठी तत्त्व सोडणाऱ्यांना
सलाम दल बदलू नेत्यांना ll
सलाम त्या सत्तेच्या खुर्चीला
जिच्यासाठी जीव तोडून धावताना
जनतेच्या प्रश्नांवर मात्र कायमच
मौनाचे आवरण घालणाऱ्या नेत्यांना ll
सलाम त्या खोट्या विकासाला
जो फलकावरच असतो लिहलेला
सलाम त्या गावातल्या रस्त्याला
पावसात खड्डे चुकवून जाणाऱ्यांला ll
सलाम त्या कथित लोकशाहीला
मतांचा उत्सव साजरा करणाराला
मतदाराच्या त्या मत प्रवृत्तीला
पैशावर मत विकणाऱ्या मतदाराला ll
सलाम त्या प्रसिद्धी माध्यमांना
नेत्यांची खोटी स्तुती करणाराला
प्रश्न विचारणाऱ्यांच्या वाटेत
वादळे उभी करणाऱ्या प्रवृत्तीला ll
पण. खरा सलाम त्या माणसाला
घामाने शेत फुलवणाऱ्या वृत्तीला
स्वप्नांच्या केवळ भाकरीसाठी
झगडत राहणाऱ्या त्या हाताला ll
खरा सलाम त्या सैनिकाला
सीमेवर बलिदान देणाऱ्या
आणि त्या शेतकऱ्याला
मातीत भविष्य पेरणाऱ्या ll
सत्ता येते, सत्ता जाते,
इतिहास सगळे लिहून ठेवतो;
जनतेच्या न्यायाच्या दरबारात
शेवटी सत्याचा विजय होतो ll
म्हणून— सलाम खुर्चीला नाही
सलाम कर्तृत्वाला नाही
सलाम त्या सत्तेला नाही
सलाम केवळ सोशिक जनतेला!
प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार
