अंगणवाडीतील बालकांना इनर्व्हील क्लब , वेंगुर्ले च्या वतीने शालेय गणवेशाचे वाटप*
वेंगुर्ला :
बालाजी सिताराम नाईक शाळा क्रमांक ३ येथील अंगणवाडीतील बालकांना इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या वतीने आज शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. बालकांना शाळेत येताना एकसमान गणवेश उपलब्ध व्हावा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमास इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या अध्यक्ष सौ. ज्योती प्रसन्ना देसाई, उपाध्यक्ष सौ. सई सुरेंद्र चव्हाण, सेक्रेटरी सौ. श्रिया मनीष परब, ट्रेझरर सौ. वृंदा विनायक गवंडळकर, मेंबर सौ. रसिका मटकर व सौ. हर्षदा शिरसाट, अंगणवाडी शिक्षिका सौ. सुनीता कांबळे तसेच पालक उपस्थित होते.
यावेळी अंगणवाडी शिक्षिका सौ. सुनीता कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. अंगणवाडीतील मुलांसाठी शालेय गणवेशाची मागणी क्लबकडे करण्यात आली होती. इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाने ही मागणी पूर्ण करून बालकांना गणवेश उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी क्लबचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच भविष्यातही अंगणवाडीतील बालकांसाठी असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या अध्यक्षा सौ. ज्योती प्रसन्ना देसाई यांनी बालकांना शुभेच्छा देत समाजातील गरजू घटकांसाठी क्लबच्या माध्यमातून यापुढेही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले.
या उपक्रमामुळे अंगणवाडीतील बालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित पालकांनीही इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
