You are currently viewing वडिलांच्या गावाशी नाळ जपत यशश्री कर्णिक यांचा करूळसाठी स्तुत्य उपक्रम

वडिलांच्या गावाशी नाळ जपत यशश्री कर्णिक यांचा करूळसाठी स्तुत्य उपक्रम

वडिलांच्या गावाशी नाळ जपत यशश्री कर्णिक यांचा करूळसाठी स्तुत्य उपक्रम

श्री. रामेश्वर मंदिरात प्रसाद वाटप; करूळ हायस्कूलच्या वाचनालयाला १० हजारांची पुस्तके देणार

करूळ

अमेरिकेत वास्तव्यास असूनही आपल्या वडिलांचे गाव करूळशी असलेली नाळ कायम जपत सौ. यशश्री मोहिरील कर्णिक यांनी गावासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त करूळ येथील श्री. रामेश्वर मंदिरात शेवटच्या सोमवारी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार असून, करूळ हायस्कूलच्या वाचनालयाला सुमारे १० हजार रुपये किमतीची पुस्तके देण्यात येणार आहेत.
यशश्री कर्णिक यांचे वडील स्व. मंगेश कर्णिक यांचे करूळ गावावर अतोनात प्रेम होते. मुंबईत वास्तव्यास असूनही ते सातत्याने गावात येत असत आणि गावासाठी काहीतरी करण्याची त्यांची कायम भूमिका होती. आपल्या परीने त्यांनी ही सामाजिक बांधिलकी जपली. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.
वडिलांच्या याच सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेत यशश्री कर्णिक यांनी अमेरिकेत वास्तव्यास असूनही आपल्या वडिलांच्या गावासाठी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. यशश्री यांचा वाढदिवस १४ ऑगस्ट रोजी असतो. त्यांनी आपल्या काकांशी, सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्याशी याबाबत चर्चा केली. यावेळी अजित नाडकर्णी यांनी या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दर्शविला.
या उपक्रमाची घोषणा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असून, करूळ हायस्कूलच्या वाचनालयाला पुस्तके देण्यात येणार आहेत. तसेच श्री. रामेश्वर मंदिरात प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
यशश्री कर्णिक यांनी मागील वर्षीही करूळ हायस्कूलमधील दहावीच्या परीक्षेत प्रथम पाच क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १००१ रुपयांचे बक्षीस देऊन प्रोत्साहन दिले होते.
“अमेरिकेत वास्तव्यास असूनही आपल्या वडिलांच्या गावाशी असलेली नाळ यशश्रीने कायम ठेवली आहे, याचा मला अभिमान आहे. तिच्या या उपक्रमामुळे करूळमधील विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना निश्चितच फायदा होईल. गावातील नागरिक तिच्या या कार्याला मनापासून दुवा देतील. श्री. रामेश्वराचा आशीर्वाद सदैव तिच्या पाठीशी राहो,” अशी भावना सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली.
यशश्री कर्णिक यांच्या या सामाजिक बांधिलकीचे करूळ ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, परदेशात राहूनही आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची त्यांची भावना निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा