You are currently viewing अपघातात मृत्यू झालेल्या प्रशांत सावंत यांच्या कुटुंबीयांना 10 लाखाची मदत सुपूर्द

अपघातात मृत्यू झालेल्या प्रशांत सावंत यांच्या कुटुंबीयांना 10 लाखाची मदत सुपूर्द

आमदार नितेश राणे यांनी दिला होता आर्थिक मदत देण्याचा शब्द

कणकवली महामार्गावर वागदे येथे अपघातात मृत्यू झालेल्या नरडवे येथील प्रशांत सावंत यांच्या कुटुंबीयांना आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून 10 लाख रुपये मदत स्वरूपात आज मंगळवारी सुपूर्द करण्यात आले. प्रशांत सावंत यांच्या पत्नी सुचिता सावंत व मुलगा प्रथमेश सावंत यांच्या जवळ माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते ही रक्कम सुपूर्द केली. वागदे येथील अपघातात प्रशांत सावंत यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर ठेकेदार कंपनीकडून या बाबतची जबाबदारी झटकली जात असतानाच माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत व सर्वपक्षीय नागरिकांनी महामार्ग रोखून धडक मृतदेह न उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात तात्काळ दखल घेत ठेकेदार कंपनीकडून 5 लाख व आमदार नितेश राणे यांच्या कडून 5 लाखाची अशी एकूण 10 लाखाची आर्थिक मदत देण्याची घोषणा श्री. राणे यांनी केली होती. त्यानंतर आज ही रक्कम आज प्रशांत यांच्या पत्नी व मुलाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, ऍड. प्रसन्ना सावंत, माजी सभापती सुरेश ढवळ,आमदार नीतेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब, गणेश राणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − eleven =