*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ऊन श्रावणातले*
(मुक्तछंद)
सरली संततधार आषाढाची,
चाहुल लागली श्रावणाची.
ऊन पाऊस खेळू लागती लपंडाव,
क्षणात सर झिम्माड पांढरी,
कधी लोभस ऊन पडे सोनेरी.
ऊन पाऊस गुंज आकाशात मेघांनी लावली मूंज मुले ओरडती.
कधी रंगते इंद्रधनू ऊन्हात सप्तरंगात,
तरूवेली सजती सोनेरी मुगूट घालुन
पळभरात पसरते सोनेरी ऊन,
गवत हिरवे जाते चकाकून,
लवलवती पाती डुलती झोकात,
भूवरी गवतफूले हंसती ऊन्हात,
मयुर नाचतो थुई थुई पिसारा फुलवोनी,
दरवळतो सुगंधी श्रावण रानीवनी,
देखणी सृष्टी मोहरली नक्षत्रावाणी,
मनात भरतो हंसरा श्रावण ऊभा अंगणी.
अनुराधा जोशी.
9820023605
