*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मुक्तीची आंस*
~~~~~~~~
आलो एकटा, जाणार एकटा
मध्ये संसारी पाऊलवाट आहे
हाच अगम्य खेळ गतजन्माचा
मुकाट भोगणेच क्रमपात्र आहे
सुख दुःख मृगजळी मायाजाल
पूर्वसंचिताचा साक्षात्कार आहे
सत्य ! एकची नाळ मातृत्वाची
जी निरपेक्ष वात्सल्यमूर्ती आहे
सभोवार सारे स्पर्श आसक्तीचे
हाच कलियुगी नग्नदृष्टांत आहे
जरी वाटले नाती सारी रक्ताची
तरीही सर्वत्र दुरत्व भासते आहे
आज जीवाचे कुणी भेटत नाही
ही एकची उरातली वेदनां आहे
संपल्या साऱ्याच संवेदना आता
केवळ मुक्तीची आंस उरली आहे
~~~~~~~~~~~~~~~~~
*©️वि.ग.सातपुते. ( भावकवी )*
