You are currently viewing मनसेचे “एक पुष्प… कृतज्ञतेचं” अभियान…

मनसेचे “एक पुष्प… कृतज्ञतेचं” अभियान…

*नैसर्गिक आपत्ती ठरलेल्या तोक्ते वादळानंतर महावितरणची झालेली पडझड व विस्कळीत झालेली विद्युत सेवा अहोरात्र राबून पूर्ववत करणाऱ्या वायरमन्सचा मनसेकडून सन्मान…*

 

कर्तव्य बजावत असताना वायरमनना येणाऱ्या समस्यांकडे मनसे शिष्टमंडळ महावितरण अधीक्षक अभियंतांचे भेट घेऊन लक्ष वेधणार….कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे

सिंधुदूर्ग :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 15 व 16 मे रोजी झालेल्या तोक्ते वादळाच्या महाप्रलयांनातर उद्भवलेली परिस्थिती व त्यामध्ये महावितरणच्या झालेली पडझडीमुळे ठप्प झालेली विद्युत सेवा पूर्वपदावर आणणे ही मोठी कसोटीची बाब होती.मर्यादित मनुष्यबळ व आवश्यक वीज साहित्य तुटवडा याचे आव्हान असताना देखील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विशेषतः वायरमन,लाईनमन यांनी जी पराकोटीची कर्तव्यनिष्ठा दाखवत अहोरात्र मेहनत घेऊन परिस्थिती पूर्वपदावर आणत जनतेला दिलासा दिला ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.स्वतःच्या जीवाची परवा न करता या कोरोना विषाणूच्या महामारी परिस्थितीची तमा न बाळगता अहोरात्र मेहनत घेणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे “एक पुष्प…कृतज्ञतेचं” अभियान राबवत आहे. या अभियानाचा आरंभ मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,सचिव राजेश टंगसाळी,उप तालुकाध्यक्ष अविनाश अणावकर आदी पदाधिकाऱ्यांनी महावितरण पणदूर सेक्शन ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला. जिल्ह्यात सर्वत्र मनसेचे पदाधिकारी सदरील अभियान राबविणार असून यावेळी विद्युत कर्मचाऱ्यांना दैनंदिन सेवा देत असताना भासणाऱ्या समस्यांचा आढावा घेऊन मनसे शिष्टमंडळ महावितरणचे अधीक्षक अभियंतांची भेट घेऊन लक्ष वेधणार आहे.”मोडून पडला संसार सारा पण मोडला नाही कणा…पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा” या कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळींनी  प्रबळ इच्छाशक्ती वाढून मनोधैर्य वाढते अगदी त्याचप्रमाणे मनसेच्या या उपक्रमामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मनोधर्य उंचावेल अशी आशा मनसेने कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 4 =