अटी, शर्तीच्या अधीन राहून व्यापार करू….

अटी, शर्तीच्या अधीन राहून व्यापार करू….

जत्रोत्सवात दुकाने लावण्यासाठी परवानगी द्या…

आमदार दिपक केसरकर यांच्याकडे स्टॉल धारकांची मागणी..

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या पारंपारिक जत्रोत्सवात आम्हाला दुकाने लावण्याची परवानगी द्या, अटी व शर्तीच्या अधीन राहून आम्ही आमचा व्यापार करू, अशी मागणी जिल्ह्यातील स्टॉलधारकांनी येथील आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली. दरम्यान कोरोनाच्या काळात आम्ही मेटाकुटीस आलो आहोत. आम्हाला व्यापार करण्यास परवानगी न मिळाल्यास आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करा, आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बाबुराव नळेकर, महेश आंगचेकर, सुशील घाडी, हेमंत पांगम, इम्तियाज शेख, सखाराम आंगचेकर, संजय तानावडे,नंदकिशोर नळेकर, हर्षाली रजपूत, जयवंत शिर्के, विष्णू गावडे, दीया मालवणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा