You are currently viewing मी स्वतःला ओळखाया आरशातच पाहतो

मी स्वतःला ओळखाया आरशातच पाहतो

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

मी स्वतःला ओळखाया आरशातच पाहतो
वाट अडवाया उभा मी वादळाला शोधतो

ऐकून होतो वेदनांनी रस्ता जरी अंधारला
वाटेतल्या काट्यांकडे मी आदराने पाहतो

वेळ येता बदलतेही आयुष्य सारे जाणतो
संकटासही वेगळ्या नजरेत मी सांभाळतो

बंधुत्व हे झाकाळले द्वेषात येथे आसमंती
शांतीचा संदेश देण्या परी मेघदूता सांगतो

ठाऊक नाही श्वास माझे येती कुठवर संगती
मृत्यूचं अंतिम सत्य जर नाते तयाशी जोडतो

पाहतो शत्रूच सारे जरी भोवती शस्त्रासवें
मैत्रीची ही धार माझ्या मी जरा आजमावतो

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 14 =