You are currently viewing राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचे श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये आयोजन.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचे श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये आयोजन.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर जिल्हास्तरीय
कार्यशाळेचे श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये आयोजन.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी व सकारात्मक अंमलबजावणी करा….. मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी.

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे मुंबई विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोंसले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी, कॉमर्स डीन
डॉ. बांबर्डेकर, जोशी बेडेकर कॉलेज ठाणे प्राचार्य डॉक्टर सौ सुचित्रा नाईक, खेड कॉलेज प्राचार्य डॉ. सौ अनिता आवटी,
मुंबई विद्यापीठाचे डेटा अॅनालिसिस डॉ. प्रवीण सिनकर, संस्थेचे संचालक प्राध्यापक डी.टी.देसाई, एस पी के महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल भारमल, एस आर एम कॉलेज कुडाळ प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे,नाथ पै. कॉलेज कुडाळ प्राचार्य प्रा.अरुण मर्गज, आनंदीबाई रावराणे कॉलेज वैभववाडी प्राचार्य डॉ. चव्हाण, देवगड कॉलेज प्राचार्य डॉ.कुनुरे, गोगटे वाळके कॉलेज प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, खर्डेकर कॉलेज प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, शिरगाव कॉलेज प्राचार्य प्रा.समीर तारी, मालवण कॉलेज प्राचार्य डॉ कैलास राबते, दोडामार्ग कॉलेज प्राचार्य डॉ. यू एल देठे, हळबे कॉलेज प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, कट्टा कॉलेजचे प्राचार्य प्रा. डी.व्ही मिराशी, अण्णा राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा . सचिन पाटकर तसेच विविध महाविद्यालयाचे एन .इ.पी समन्वयक,आय. क्यू. ए. सी कॉर्डिनेटर, परीक्षा समिती प्रमुख व प्राचार्य या कार्यशाळेमध्ये उपस्थित होते.
कार्यशाळे चे प्रास्ताविक
श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले आणि कार्यशाळेचा उद्देश विशद केला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी स्वायत्त महाविद्यालयाने 2023 तर स्वायत्त नसलेल्या महाविद्यालयाने 2024 साली राबविलेला अभ्यासक्रम तसेच प्राध्यापकांचा वर्कलोड सर्व सहा व्हर्टीकल्स च्या माध्यमातून केलेले अभ्यासक्रम याविषयी आढावा घेण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेच्या आयोजन केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमधील प्राचार्य व एन .इ. पी . समन्वयक यांना या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे असे ते म्हणाले.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्री असून विकसित भारताच्या निर्मितीसाठी यामध्ये शिक्षक,विद्यार्थी, संस्थाचालक यांचं योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी त्यासोबतच त्यांना जागतिक स्पर्धेमध्ये उभे करणे हा या शैक्षणिक धोरणाचा उद्देश आहे या कार्यशाळेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालये व त त्यांचे प्राचार्य यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेमध्ये चर्चा केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे पर्यटनाला अनुकूल असे कोर्सेस त्याचबरोबर येथील असलेली जैवविविधता याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने येथील अभ्यासक्रमामध्ये त्याचा सहभाग करून घेणे हे गरजेचे आहे असे ते म्हणाले. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोंसले यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी यांचे आभार मानले की त्यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये या कार्यशाळेचे आयोजन केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आलेल्या सर्व प्राचार्यांना त्यांनी आवाहन केले की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करताना येणाऱ्या अनेक समस्या याविषयी कुलगुरू मार्गदर्शन करणार आहेत, या जिल्ह्याचा विचार करता येथील स्थानिक गरजा तसेच उद्योजकता निर्माण करण्यासाठी व करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने येथील अभ्यासक्रम तयार होणे आवश्यक आहे.याविषयी सकारात्मक चर्चा या कार्यशाळेच्या माध्यमातून होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.एस एम बुवा यांनी केले तर आभार डॉ. एस ए देशमुख यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा