राजेसाहेबांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त सावंतवाडीत भव्य रक्तदान शिबिर
एसपीके महाविद्यालय व ऑन कॉल रक्तदाते संस्थेचा संयुक्त उपक्रम; जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
सावंतवाडी :
लेफ्ट. कर्नल हि. हा. श्रीमंत शिवरामराजे भोंसले (राजेसाहेब) यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या संस्थापक दिनाचे औचित्य साधून गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत्त) आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत एसपीके महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये होणार आहे. रक्तदान हे सामाजिक बांधिलकीचे कार्य असून, गरजू रुग्णांसाठी रक्ताची उपलब्धता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी डॉ. सचिन देशमुख (एनसीसी आर्मी प्रमुख) ७८७५५८२८५०, डॉ. सुधीर बुवा (राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख) ९४२२८१०२२६, ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सदस्य मंगेश माणगावकर ७४९८६२१२३५, कार्यकारिणी सदस्य दिनेश गावडे ९४२०७४०४४४, सचिव बाबली गवंडे ८३९०९०५२६९ तसेच खजिनदार सिद्धार्थ पराडकर ९४२२९६७२४९ यांच्याशी संपर्क साधावा.
महाविद्यालयाचे प्राचार्य भारमल सर तसेच ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान शिबिराला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
