You are currently viewing सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडिअम स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश 

सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडिअम स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश 

सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडिअम स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

वेंगुर्ले

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इयत्ता सातवी) ची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल ची विद्यार्थिनी सोनाक्षी समीर तेंडोलकर ही ग्रामीण अनुसूचित जाती मधून तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून तर ऋण्मई तुकाराम साळगावकर ही ग्रामीण सर्वसाधारण मधून तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त करून शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे.
दोन्ही विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर ,सचिव दत्तात्रय परुळेकर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा