You are currently viewing तरंदळे येथे स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य मार्गदर्शन शिबिर

तरंदळे येथे स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य मार्गदर्शन शिबिर

*तरंदळे येथे स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य मार्गदर्शन शिबिर; समाजकल्याण सभापती रुहिता तांबे यांची उपस्थिती*

_जि.प. योजनांसह मातृ-बाल आरोग्यावर विशेष मार्गदर्शन; गरोदर माता व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद_

*तरंदळे* :

स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून महिला व बाल कल्याण विभाग आणि अंगणवाडी केंद्र तरंदळे नंबर 1 यांच्या पुढाकाराने गरोदर माता, स्तनदा माता आणि पालकांसाठी मातृ-बाल आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला गावातील महिला व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरासाठी जिल्हा परिषद सदस्या तथा समाजकल्याण सभापती *रुहिता तांबे* या विशेष मार्गदर्शक व प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित मातांना मार्गदर्शन करताना सांगितले, *”पहिल्या सहा महिन्यात फक्त स्तनपान हेच बाळाचे खरे कवच आहे. नवजात बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी आईच्या दुधाला कोणताही पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक आईने स्तनपानाला प्राधान्य द्यावे.”*

याशिवाय बाळाला योग्य पद्धतीने स्तनपान कसे करावे, स्तनपानादरम्यान घ्यावयाची काळजी आणि मातांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. गावाच्या विकासकामांसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून त्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध महिला व बालकल्याण योजनांची माहितीही उपस्थितांना दिली.

महिला बाल कल्याण पर्यवेक्षक *पै मॅडम* यांनी गरोदर मातांनी घ्यावयाचा पौष्टिक आहार, दैनंदिन जीवनशैली आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या *CHO रासम मॅडम* यांनी जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काळात स्तनपानाचे महत्त्व पटवून देत शासकीय आरोग्य योजनांची माहिती दिली.

सरपंच *सुशील कदम* यांनी बोलताना सांगितले, “आईचे दूध हे नवजात बालकासाठी अमृत आहे. त्यामुळे बाळाचे पोषण होण्याबरोबरच त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. महिला व बालकांचा दर्जा उंचावण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत आरोग्य शिबिरांवर विशेष लक्ष दिले जाईल.”

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “चला, आपण सर्व मिळून स्तनपानाला प्रोत्साहन देऊ आणि निरोगी पिढी घडवू” असा संकल्प केला.

*उपस्थित मान्यवर* : समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, सरपंच सुशील कदम, उपसरपंच शुभावली सावंत, महिला बाल कल्याण पर्यवेक्षक पै मॅडम, CHO रासम मॅडम, माईणकर सिस्टर, आशा कार्यकर्त्या आशा कदम, मुणगेकर, अंगणवाडी सेविका सावंत, कदम, सामंत, पावसकर मॅडम, अंगणवाडी मदतनीस, तसेचअभय सावंत, वनिता कदम, शाळा नंबर 1 चे मुख्याध्यापक डोईफोडे सर, शिक्षक, महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_आयोजक : अंगणवाडी केंद्र तरंदळे नंबर 1, महिला व बाल विकास विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, ग्रामपंचायत तरंदळे_

प्रतिक्रिया व्यक्त करा