*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अबोलाही ..कधी कधी……!!*
स्मित.. कधीच
छळत नाही
हसलचं पाहिजे
असही ..नाही…
अबोलाही कधीकधी
बोलका …असतो
मौनातही खूप
सांगून …जातो…
बिंबाचं ..प्रतिबिंब
डावउजवं होतं
दृष्टाव्यांना भाळून
रूपही…पालटत..
भोगाची वस्त्रे
मळकी होतात
त्यागाची वस्त्रे
तेजाने उजळतांत..
बिंब ..प्रतिबिंब
जाणिवेत असतं
मनाच्या तळाशीचं
दर्शन …देतं..
अबोलाही कधीकधी
मुकेपणाला ..पांघरतो
उसवत ..नाही
सांधत …जातो…..!!
बाबा ठाकूर
