You are currently viewing 15 ऑक्टोबर रोजी हात धुवा दिनाचे आयोजन

15 ऑक्टोबर रोजी हात धुवा दिनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी : 

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयात दिनांक 15 ऑक्टोबर 2020 रोजी जागतिक हात धुवा दिनाचे औचित्य साधुन कार्यालय स्वच्छता व हात धुवा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

          केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 1ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. तसेच 15 ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन आहे. या निमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्राममपंचायत कार्यालय, आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय येथे सायं. 3 ते 5.30 या दरम्यान कार्यालय स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच सध्यस्थितीत हात धुण्याचे महत्व पटवून देण्यासाठी सर्व कार्यालयात हात धुवा दिन साजरा करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आहावन पाणी व स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − two =