You are currently viewing ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव-बोर्डवे येथे समूहगीत स्पर्धेचे आयोजन

ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव-बोर्डवे येथे समूहगीत स्पर्धेचे आयोजन

ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव-बोर्डवे येथे समूहगीत स्पर्धेचे आयोजन

‘क्रांतीची ज्योत तेव्हा पेटली, स्वातंत्र्याची स्वप्ने तेव्हा साकारली!’ या घोषवाक्याखाली ९ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम

ओसरगाव :

धी कसाल शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल, ओसरगाव-बोर्डवे यांच्या वतीने ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता शाळेच्या प्रांगणात समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
“क्रांतीची ज्योत तेव्हा पेटली, स्वातंत्र्याची स्वप्ने तेव्हा साकारली!” या घोषवाक्याखाली आयोजित कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व क्रांतिकारकांच्या प्रतिमापूजनाने होणार आहे. त्यानंतर प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत, समूहगीत स्पर्धा, परीक्षकांचे मार्गदर्शन, निकाल जाहीर करून विजेत्यांना बक्षीस वितरण, आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा