*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मैत्र*
🪷🪷
मैत्र एकची भाग्य भाळीचं
नातं आगळं परंविश्वासाचं
तिथेच नसतो भाव अपपर
नातं जरी नसलं ते रक्ताच
मैत्र निर्मळ आधार शाश्वत
निश्चिन्ततेच अभेद्य कवच
जन्मच मानवी ऋणानुबंधी
असते तेही भाळीचे संचित
मित्रत्व असावे कृष्णसुदामा
जसे नाते निर्मोही दिगंतराच
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
*©️वि.ग.सातपुते. (भावकवी)*
