You are currently viewing मुक्ताई ॲकेडमीच्या शहरस्तरीय कॅरम स्पर्धेत आदित्य, जयेश आणि आस्था ठरले अव्वल

मुक्ताई ॲकेडमीच्या शहरस्तरीय कॅरम स्पर्धेत आदित्य, जयेश आणि आस्था ठरले अव्वल

मुक्ताई ॲकेडमीच्या शहरस्तरीय कॅरम स्पर्धेत आदित्य, जयेश आणि आस्था ठरले अव्वल

कै. सूर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ स्पर्धा; ७१ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, विजेत्यांना रोख पारितोषिकांसह चषक व प्रशस्तीपत्रांचे वितरण

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै. सूर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुक्ताई ॲकेडमीच्या वतीने आयोजित सावंतवाडी शहर मर्यादित कॅरम स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाटणकरवाडी येथील ॲकेडमीच्या कॅरम प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या स्पर्धेत पहिली ते दहावीपर्यंतच्या ७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
स्पर्धेच्या विविध गटांमध्ये आदित्य सुर्वे, जयेश जाधव आणि आस्था लोंढे यांनी विजेतेपदावर नाव कोरले. यावेळी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना कॅरम खेळातील तांत्रिक बाबी, शिस्त आणि सातत्याचे महत्त्व समजावून सांगितले.
स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार ॲकेडमीच्या सरचिटणीस सौ. स्नेहा पेडणेकर आणि राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. विजेत्यांना रोख रक्कम, चषक, पदके आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कौस्तुभ पेडणेकर यांनी लवकरच विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सौ. स्नेहा पेडणेकर यांनी केले.
स्पर्धा पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा तीन गटांत घेण्यात आली. प्रत्येक गटात मुलांसाठी चार व मुलींसाठी तीन अशा एकूण २१ पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धेतील विजेते :
पहिली ते तिसरी गट :
मुलांमध्ये आदित्य सुर्वे (प्रथम), मितांश पेडणेकर (द्वितीय), हर्षवर्धन गुरव (तृतीय), शहजान नदाफ (चतुर्थ).
मुलींमध्ये चैतन्या दाभोलकर (प्रथम).
चौथी ते सहावी गट :
मुलांमध्ये जयेश जाधव (प्रथम), रत्नजित मोहिते (द्वितीय), मोहम्मद फैजान खान (तृतीय), नुमान नदाफ (चतुर्थ).
मुलींमध्ये आर्या शेख (प्रथम).
सातवी ते दहावी गट :
मुलांमध्ये चारुदत्त गवंडे (द्वितीय), स्मित सावंत (तृतीय), अरमान शेख (चतुर्थ).
मुलींच्या गटात आस्था लोंढे (प्रथम), आरजू शेख (द्वितीय) आणि ईशानी सावंत (तृतीय) यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.

प्रतिक्रिया व्यक्त करा