आम्ही राणेंचेच कार्यकर्ते; शिवसेना प्रवेशाचा प्रश्नच नाही

आम्ही राणेंचेच कार्यकर्ते; शिवसेना प्रवेशाचा प्रश्नच नाही

आम्ही राणेंचेच कार्यकर्ते ; शिवसेना प्रवेशाचा प्रश्नच नाही

देवगड

देवगड जामसंडे नगरपंचायत चे भाजपा नगरसेवक विकास कोयंडे, नगरसेविका श्रुती जाधव यांनी शिवसेनाप्रवेशाचा इन्कार केला असून विकासकामांसाठी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. देवगड- जामसंडे नगरपंचायत वर भाजपाची एकहाती सत्ता आहे. आमदार नितेश राणेंनी स्वबळावर देवगड नगरपंचायत ची सत्ता खेचून आणली आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतचे भाजपा नगरसेवक विकास कोयंडे, नगरसेविका श्रुती जाधव यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संदेश पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली. मात्र या बातमीत तथ्य नसून केवळ विकासकामांबाबत पालकमंत्र्यांची आपण भेट घेतली. आम्ही भाजपाचे आणि राणेंचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे भाजपा सोडून अन्य पक्षप्रवेशाचा प्रश्नच नाही असा खुलासा नगरसेवक विकास कोयंडे आणि नगरसेविका श्रुती जाधव यांनी दिला आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, भाजपा देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, भाजपा महिला तालुकाध्यक्षा उशःकला केळुसकर, नगरसेवक योगेश चांदोसकर, उमेश कणेरकर, ज्ञानेश्वर खवळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा