*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ साहित्यिका सुगरण डॉ.अर्चना पंडित यांची पाककृती*
*भूट्ट्याची साटोरी किंवा करंजी*
*साहित्य_*
भरण्यासाठी
4/5 भुट्टे , एक वाटी साखर ,वेलची पूड ,दोन चमचे किसलेल खोबरं
कव्हर = दीड वाटी मैदा ,दीड टेबल स्पून तेल
तळण्यासाठी तूप.
*विधी*: भुट्टे किसून घ्या , कढइत तुपावर त्याला घालून वाफेने शिजवा. मोकळा झाला की साखर वेलची पावडर घालून ढवळा . त्याला परत पाणी सुटते .खाली लागू देऊ नका .परत घट्ट होऊ द्या .ते सारण कोरडे करून घ्या .त्यात किसलेल खोबरं गुलाबी भाजून घाला .
कव्हर = दीड वाटी मैदा घ्या त्यात दीड चमचा तेल गरम करून घाला व पीठ व्यवस्थित मळून घ्या .ह्याचे गोळे करून त्यात सारण भरून थोडे चपटे हलक्या हातानेच करून घ्या .एका तव्यावर तीन चार साटोऱ्या आलटून पालटून फक्त एक मिनिट भाजून घ्या . मग तुपात गुलाबी रंगाच्या तळून घ्या .
तयार आहे भुट्टयाची साटोरी .
ह्याच तयार साहित्याने शेवटी त्याची करंजी पण करू शकता.
कवियत्री समाजसेविका
डॉ अर्चना पंडित इंदौर
🙏🙏
