You are currently viewing शिवशंभू प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी जय भोसले यांची सलग तिसऱ्यांदा निवड

शिवशंभू प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी जय भोसले यांची सलग तिसऱ्यांदा निवड

शिवशंभू प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी जय भोसले यांची सलग तिसऱ्यांदा निवड

रायगड जिल्हाध्यक्षपदी यश घरत, सोशल मीडिया राज्यप्रमुखपदी सीताराम कळंबे; नूतन कार्यकारिणीची घोषणा

बांदा

देव, देश आणि धर्म या मूल्यांसाठी कार्यरत असलेल्या शिवशंभू प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या संघटनेची नूतन कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष सत्यवान जाधव यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी जय भोसले यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच रायगड जिल्हाध्यक्षपदी यश घरत, तर सोशल मीडिया राज्यप्रमुखपदी सीताराम कळंबे यांची निवड करण्यात आली आहे.
शिवशंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून देव, देश आणि धर्माच्या रक्षणासह विविध सामाजिक, धार्मिक आणि जनहिताचे उपक्रम सातत्याने राबवले जातात. ही कार्यपरंपरा अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याची जबाबदारी नूतन पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
सलग तिसऱ्यांदा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले जय भोसले हे पत्रकार म्हणून कार्यरत असून, ते व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष आहेत. याशिवाय ते सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट कॉमेंटरेटर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व विद्यमान सचिव असून, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी संघटनेचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
सामाजिक, क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत प्रतिष्ठानने त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यासह विविध सामाजिक, पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा