You are currently viewing कवठणी, रस्ता डांबरीकरण करा अन्यथा उपोषणाचा इशारा..

कवठणी, रस्ता डांबरीकरण करा अन्यथा उपोषणाचा इशारा..

सावंतवाडी :

 

कवठणी मुख्य रस्ता ते मुरडीवाडी ते ख्रिश्चनवाडी मळेबागवाड़ी पर्यत रस्ता करणे हे काम रस्ते दुरुस्ती विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर आहे. सदरच्या कामाची निविदा प्रक्रीया जानेवारी २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे. सदर कामाचा कार्यारंभ आदेश होऊन तीन महिने झालेले आहेत. तरीही मक्तेदाराने सदरचे काम आजपर्यंत सुरु केलेले नाही.

सदर रस्ता मंजूर होऊनही काम चालू होत नसल्यामुळे विनाकारण ग्रामास्थांच्या रोषाला सामोरे जावे लागते. याची कल्पना सदर मक्तेदारास दिलेली आहे.  तरीपण सदर मत्तेदार काम सुरु करण्यास टाळाटाळ करतो. त्यामूळे सदर कामाबाबत आपण जातीनिशी लक्ष घालून सदरचे काम चार दिवसात सुरु करण्यात यावे, अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा कवठणी सरपंच सुमन सुधा कवठणकर यांनी दिला आहे.

सदरचा रस्ता पूर्णपण खराब झालेला असून सदर रस्त्यावर चालणे सुद्धा कठीण झालेले आहे. रस्त्याची चाळण झाल्यामुळे रस्त्यावर मोटर सायकल व चार चाकी गार्डीचे अपघात झालेले आहेत. सदर मक्तेदारास रस्त्याबाबतची वारंवार कल्पना देऊनही काम करण्यास टाळाटाळ करत आहे. सदर मक्तेदाराशी संपर्क साधला असता मक्तेदार उडवाउडवीची उतरे देत आहे.  सदर रस्ता मंजूर होऊनही काम चालू होत नसल्यामुळे विनाकारण ग्रामास्थांच्या रोषाला सामोरे जावे लागते. याची कल्पना सदर मक्तेदारास दिलेली आहे.  तरीपण सदर मत्तेदार काम सुरु करण्यास टाळाटाळ करतो. त्यामूळे सदर कामाबाबत आपण जातीनिशी लक्ष घालून सदरचे काम चार दिवसात सुरु करण्यात यावे. सदरचे काम चार दिवसात सुरु न झाल्यास ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थां समवेत १९ /४/२०२१ रोजी आपल्या कार्यालयाकडे उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 14 =