You are currently viewing मैत्री एक अनमोल नाते
Oplus_16908288

मैत्री एक अनमोल नाते

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम लेख*

 

*मैत्री एक अनमोल नाते*

 

मैत्री कोणाशी करावी हे काही ठरलेले नसते, ती आपोआप होते, नकळत जुळते. पण जी निरपेक्ष आणि निस्वार्थी असते अशी मैत्री

करायला मला आवडते. जीवनात आपल्याला असंख्य माणसे भेटतात. अनेक प्रकारची माणसे भेटतात. कधी योगायोगाने तर कधी ठरवून, कधी कामानिमित्त, तर कधी प्रवासात, कधी शाळेत, विद्यालयात, नाते संबधात, कार्यक्रमात, नोकरीच्या ठिकाणी वगैरे अनेक ठिकाणी अनेक प्रकारची माणसे भेटतच असतात.

. आपली ओळख होते, कधी काही व्यक्ती खूप जवळच्या वाटतात, त्यांना काही आपले अनुभव किंवा मनातल्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. त्यांचे ही म्हणणे पटते, ऐकावेसे वाटते.

पण हे सर्व जरी खरे असले तरी आणि माझी मैत्री खूप जणांशी असली तरी मला मात्र अत्यंत जवळचे असे नाते, अशी मैत्री परमेश्वराचीच करावीशी वाटते, निसर्गाशी करावीशी वाटते, कारण त्याची मैत्री अगदी निस्वार्थ व. निस्पृह असते, देवाला, निसर्गाला आपल्याकडून काहीच नको असते हा भाग तर वेगळाच पण, निसर्ग, देव हे आपल्याकडून कसलीही अपेक्षा न ठेवता ते आपल्याला देण्याचे काम करतात. पण म़्हणून ही मैत्री नाही तर, देव किंवा निसर्ग अगदी निखळ माया करतात, न मागता आपल्याला देतात, त्याहीपेक्षा आपल्या मनातल्या गोष्टी आपण अगदी सहजपणे त्यांना सांगू शकतो, त्यांच्यावर डोळे मिटून भरवसा ठेवू शकतो. आपल्याला त्यांच्या मदतीची अपेक्षा ठेवायचीच नाही, त्यामुळे आणि ते कोणत्याही परिस्थितीत बेभरवशाने आपली सुखदुःखे कोणालाही सांगायला जाणार नसतात तर ते मनापासून ऐकण्याचे काम करत असतात.

दिलासा देत असतात.

. अशा या निसर्गाशी फुलझाडांशी

आपण बिनधास्त मैत्री करु शकतो

आपल्याला त्यांनी जरी आर्थिक मदत केली नाही तरी मानसिक बळ नक्कीच मिळू शकते.

. मनातले काही बोलायचे असले की, देवबाप्पा कधीही आपले म्हणणे ऐकून घेतो. शांतपणे डोळे मिटून त्याचे ध्यान केले की, आपल्या अंतर्मनात एक सुखद अनुभूतीची विश्वासार्ह जाणीव होते.म्हणूनच मला अशी निखळ, निस्वार्थ मैत्री फार आवडते.आणि त्या देवाशी असलेले मैत्रीचे अतूट जीवाभावाचे नाते मला जगण्याचे बळ देते, माझे मार्गदर्शक ठरते, मला सुंदर निखळ आनंद देते, जीवनाची नवी दिशा दाखवते. स संकटातून मुक्त करते.

. तर अशा विधात्या सृष्टीकर्त्या परमेश्वराची मैत्री माझ्या जीवनाचा आधार आणि मार्गदर्शक असल्याने कधी या मैत्रीने पश्चाताप करायची वेळ येणार नाही याची पूर्ण खात्री आहे.

 

ही मैत्री अशीच अबाधित राहो, हे दयाघना, तुझ्याकडे एवढेच मागणे आहे, माझ्या या निरागस मैत्रीचा स्वीकार करुन तू फक्त एवढेच मैत्रीचे वरदान दे की, कधीही मला अहंकार होऊ नको देऊ, आपली मैत्री अशीच निरागस, निर्लोभी ठेव.

हा मैत्रीचा वारसा जपण्याची शक्ती दे. प्रेम, माया, ममता, वात्सल्य या भावना मनात वसू दे. सर्वांशी सहृदयतेने वागण्याची शक्ती दे.

निसर्ग, देव यांच्याप्रती कृतज्ञतेची जाणीव ठेव.सर्व सज्जनांशी प्रेमळपणे, नम्र पणे, आदरयुक्त वागण्याची बुद्धी दे.

. देवा, निसर्गा आपली मैत्री अबाधित राहू दे.

💐💐💐💐

मैत्री दिनाच्या नाही,

तर सदैवच शुभेच्छा असू दे.

🙏💐

 

 

स्वप्नगन्धा सतीश आम्बेतकर,

कलाशिक्षिका.

प्रतिक्रिया व्यक्त करा