*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री समाजसेविका सुगरण डॉ.अर्चना पंडित लिखित अप्रतिम पाककृती*
*होममेड पिझ्झा विथ होम मेड बेस*
आजकाल मुलांना रोज बाहेरून मागून पिझ्झा खायचा असतो.त्यासाठी मी घरीच हा पिझ्झा तयार केला . त्यासाठी लागणारे साहित्य _
दोन वाट्या गरगरीत कणिक
अर्धी वाटी पोळ्याची कणिक
तेल दीड वाटी ,दोन चिमूट खायचा सोडा,अर्धा चमचा साखर
मीठ चवीनुसार
भाज्या _ एक छोटा कांदा , दोन सिमला मिरची, एक मोठा टमाटर , एक बारीक मिरची, कोथिंबीर , दोन ते तीन चीज क्युब्स.
तयारी_ कांदा, सिमला मिरची ,बारीक मिरची बारीक चिरून घ्यावे . टमाटर हे बारीक चिरून घ्यावे . सिमला मिरची आणि टमाटर यातल्या आतल्या बिया मात्र काढून टाकाव्या . कोथिंबीर बारीक चिरून ठेवून घ्यावी .
थोडासा खोल नॉनस्टिक पॅन तापायला ठेवा . त्यात एक टेबलस्पून तेल घालायचे . दोन्ही कणिक एकत्र करून त्यात अर्धा टेबलस्पून मोहन घालून , दोन चिमूट सोडा , अर्धा चमचा साखर , चवीनुसार मीठ घालावे आणि पाण्याने थोडसं सैलसर भिजवावे केक बॅटल सारखे . त्याला मळायचे नाही . आणि पॅनवर बोटांनी पसरावे .
त्यावर डिझाईन सारखे मांडून भाज्या टाकाव्या सर्वात वरती चीज किसून टाकावा . आणि झाकण ठेवून द्या . मध्यम आचेवर ठेवा . थोडं चीज मेल्ट झालं की झालंय असं समजा. तयार आहे होममेड पिझ्झा विथ होममेड बेस.
कवयित्री समाजसेविका
डॉ अर्चना पंडित इंदौर
🙏🙏
