You are currently viewing अमुचा मराठी बाणा

अमुचा मराठी बाणा

*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अमुचा मराठी बाणा*

 

इडली सांबार हवं असतं

सकाळी उठल्या उठल्या

कधी तरी बदल म्हणून छोले परोठे न्यहारीला

 

स्वीट कॅार्न मँन्चॉव सूप

जेवणाच्या आधी हवं

पनीररोल हरभरा कबाब

स्टार्टर म्हणून हवं

 

पिझ्झा पास्ता माँचुरियनविना

मज्जा नाही जेवणाला

उंधियो ढोकळ्याविना

चव कशी हो तोंडाला

 

दाळ बाटी चुरमा याचा

आनंदच वेगळा

गठ्ठा करी ओसामन भाकरी आस लागते मनाला

 

चहासंगे पापडी फरसाण

अस्सं काही चुरचुरीत हवं

अधूनमधून तोंडी लावायला

खारी आणि नमकीन हवं

 

बर्गर दाबेली स्प्रिंगरोल

खायची मिटक्या मारत

गार्लिक सँडविच सिझलरविना घास नाही उतरत

 

दिवस दिवस अस्सा असतो

विदेशी खाना खजाना

तरीसुध्दा म्हणत रहायचं ?

अमुचा मराठी बाणा

अमुचा मराठी बाणा

 

डॉ.शरयू शहा,

प्रतिक्रिया व्यक्त करा